Yogesh Bhoir : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक, प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ठाकरे गटाचे कांदिवलीतील माजी नगरसेवक (former corporator from Kandivali) योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांना अटक करण्यात आलीये. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) मंगळवारी रात्री योगेश भोईर यांच्यावर अटकेची कारवाई केली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भोईर यांना एका खंडणी प्रकरणात (extortion case) अटक करण्यात आलीये. (Yogesh Bhoir, former corporator from Kandivali arrested by Mumbai Police Crime Branch in extortion case)

ADVERTISEMENT

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कांदिवलीतील माजी नगरसेवक योगेश भोईर यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या यूनिट 11 टीमने अटक केली. योगेश भोईर यांना खंडणी प्रकरणात अटक केली असून, पोलिसांनी याबद्दल सविस्तर माहिती दिलीये.

योगेश भोईर यांच्याविरुद्ध समता नगर पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याने तक्रार दिली होती. व्यापाऱ्याने योगेश भोईर यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केलेला आहे. व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी (27 डिसेंबर) भोईर यांना अटक केली.

हे वाचलं का?

‘कर्णपिशाचानं ग्रासलं आहे का?’, सेनेचा घोटाळ्यावरून फडणवीसांवर पलटवार

योगेश भोईर यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक भोईर यांच्याविरुद्ध भादंवि 386, 506 आणि 34 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश भोईरांच्या पत्नीने केले आरोप

योगेश भोईर यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नीने काही आरोप केलेत. योगेश भोईर यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. त्यांची भेटही घेऊ दिली जात नाहीये, असे आरोप भोईर यांच्या पत्नीने केले आहेत.

ADVERTISEMENT

फडणवीस ते गोगावले : अजित पवारांनी एक तास वाभाडे काढले; सभागृह फक्त ऐकत राहिलं!

ADVERTISEMENT

योगेश भोईर यांना चौकशीसाठी बोलावलं आणि अटक केली

माजी नगरसेवक योगेश भोईर यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीनंतर भोईर यांना अटक करण्यात आली.

योगेश भोईर यांचे वकील जयंत पाटील म्हणाले, ‘न्यायालयाचे आदेश आहेत की, योगेश भोईर यांना अटक केली जाऊ शकत नाही. तरीही पोलिसांनी त्यांना धोक्यानं बोलावून घेतलं आणि अटक केली. योगेश भोईर यांच्याविरुद्ध खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. जे अजूनही सिद्ध झालेले नाहीत,’ असं भोईर यांच्या वकिलांनी सांगितलं.

अनिल परब यांना आणखी एक संधी देतो, आरोप सिद्ध करा अन्यथा… : शंभुराज देसाईंचा इशारा

शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी

माजी नगरसेवक योगेश भोईर यांना पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली. खंडणी प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते गुन्हे शाखा यूनिट 11 च्या बाहेर जमा झाले. त्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत अटकेचा निषेध केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT