उदयपूर, अमरावती अन् आता नगर; नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने तरुणाला बेदम मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहित वाळके

ADVERTISEMENT

अहमदनगर: उदयपूर, अमरावतीनंतर अहमदनगरच्या कर्जतमध्ये नूरूप शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने तरुणाला भारी किंमत मोजावी लागली आहे. पाच ते सात जणांनी त्या तरुणाला लाकूड, तलवारीने बेदम मारहाण केली आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

सोशियल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने मारहाण

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात राहणारा प्रतिक पवार याने काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर काही मुस्लिम तरुण त्याच्यावर संतापले होते. त्यानंतर पांढऱ्या रंगाची आणि काळ्या रंगाची गाडी असलेल्या काही तरुणांनी त्याला अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. पोस्ट सोशियल मीडियावरती शेअर केल्याचा राग मनात ठेऊन प्रतिकला लाकूड आणि तलवारीने वार केला, त्याच्या मित्राने वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला.

हे वाचलं का?

तरुणांची प्रतिकला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

तरुणांनी प्रतीकला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली, त्यानंतर सर्वांनी पळ काढला. प्रतिकचा मित्र अमित याने त्याला तातडीने अहमदनगरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. रात्री उशिरा प्रतिकची प्रकृती पाहता त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या प्रतिकची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, त्याला ICUमध्ये ठेवण्यात आले आहे, या प्रकरणी अहमदनगरचे एसपी मनोज पाटील यांनी माहिती दिली आहे. स्टेटस ठेवण्याच्या कारणावरुन त्याला मारहाण करण्यात आली. आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत, याप्रकरणी आम्ही आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिकला झालेल्या मारहाणी प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कर्जत शहरात दुकानं बंद ठेवून या घटनेचा निशेष करण्यात आला आहे, याआधी आरोपी शाहरुख पठाण याने प्रकितसोबत भांडण करून त्याला मारहाणा केली होती.

ADVERTISEMENT

उदयपूर, अमरावतीमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने हत्या करण्यात आली होती. दोन्ही घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये सात आरोपींनी मिळून एका व्यक्तीची हत्या करण्यात केली होती. आता कर्जतमध्ये तरुणाला झालेल्या मारहाणीवरुन राज्यातील वातावरण तापले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT