पुण्यात रंगाचा भंग! ‘रंग का लावला’ म्हणत कोयत्याने केले वार, तरुणाचा जागेवरच मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तब्बल दोन वर्षानंतर देशासह महाराष्ट्राच्या विविध भागात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करत सर्वांनी धुळवड साजरी केली. पण काही ठिकाणी धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागल्याचे प्रकार घडले. पुण्यातही रंग लावण्याच्या कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील बिबवेवाडी भागात एका तरुणाला चौघांनी रंग लावला. त्यावरून झालेल्या वादातून, त्याच तरुणावर चाकू आणि कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

योगेश रामचंद्र पवार (वय २१) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनी भोडेकर आणि ओंकार खाटपे अशी आरोपींची नावे आहेत.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील सुपर इंदिरानगर येथील बी ५८ चाळ येथून सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास योगेश पवार हा दुचाकी वरून जात होता.तेव्हा तिथे विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनी भोडेकर आणि ओंकार खाटपे रंग खेळत होते.

या चौघांपैकी एकाने योगेश पवार याच्यावर रंग फेकला. योगेशने पुढे जाऊन दुचाकी बाजूला घेतली आणि माझ्यावर रंग का फेकला असं म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनी भोडेकर आणि ओंकार खाटपे यांनी बाजूला असलेल्या सिमेंटच्या पाईप मधून चाकू आणि कोयत्याने योगेश पवार याच्यावर वार करण्यास सुरुवात केली.

ADVERTISEMENT

चौघांनी केलेल्या हल्ल्यामध्ये योगेश पवार हा रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडून राहिला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

मयत झालेल्या योगेश पवार याच्यावर गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT