केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांचं आंदोलन

आश्रमशाळेची जागा महामार्गात गेल्यामुळे गडकरींच्या घरासमोर भरवली शाळा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांचं आंदोलन

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आज अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेच्या मुलांनी आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ येथेली हे विद्यार्थी आज आपल्या शिक्षकांसोबत गडकरींच्या घरासमोर दाखल झाले होते.

फासेपारधी समाजाच्या या मुलांसाठी बांधण्यात आलेली आश्रमशाळा महामार्गाच्या जागेत गेली आहे. त्यामुळे शासनाने शाळा आणि वाचनालयाची पुन्हा उभारणी करुन द्यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन करत गडकरींच्या घरासमोर शाळा भरवली.

दरम्यान नितीन गडकरी यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर गडकरी गोव्याला रवाना झाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in