मलिक म्हणाले, ‘मी रात्रीचे उद्योग करत नाही…’, तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का?; मुनगंटीवारांचा टोमणा!
मुंबई: विधानसभा 2019 निवडणुकीनंतर पहाटे झालेल्या शपथविधीमुळे आजही भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेकदा टार्गेट केलं जातं. राजकीय सभांमधील भाषणात यावरुन बरीच टीकाही केली जाते. मात्र, आता थेट सभागृहात याच गोष्टीवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चिमटे काढले आहेत. नेमकं काय झालं सभागृहात? ‘मुस्लिम आरक्षण देण्यासंदर्भात शासन […]
ADVERTISEMENT

मुंबई: विधानसभा 2019 निवडणुकीनंतर पहाटे झालेल्या शपथविधीमुळे आजही भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेकदा टार्गेट केलं जातं. राजकीय सभांमधील भाषणात यावरुन बरीच टीकाही केली जाते. मात्र, आता थेट सभागृहात याच गोष्टीवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चिमटे काढले आहेत.
नेमकं काय झालं सभागृहात?
‘मुस्लिम आरक्षण देण्यासंदर्भात शासन विचाराधीन आहे.’ असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सभागृहात म्हटलं होतं. यावेळी नोकरी, शैक्षणिक संस्था यामध्ये मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, जोवर 50 टक्क्यांची अट शिथिल होत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही आणि मुस्लिम आरक्षण देता येत नाही हे मलिकांनी स्पष्ट केलं.
नवाब मलिक यांनी हे विधान केल्यानतंर सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ याबाबत भाष्य करताना चिमटेही काढले आहेत. अजित पवारांच्या शपथविधीवरुन हे चिमटे त्यांनी काढले आहेत. ‘मी रात्रीचे उद्योग करत नाही.’ असं मलिकांनी म्हटलं होतं. यावर चिमटा काढताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘तुम्ही अजित पवारांबाबत बोलताय का?’ असा सवाल विचारत मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवरच निशाणा साधला.