प्रकाशक सुनील मेहता यांचं निधन, आज पुण्यात अंत्यसंस्कार
पुणे: मेहता पब्लिशिंग कंपनीचे संचालक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे माजी कार्यकारी सुनील मेहता ( Sunil Mehta, director of Mehta Publishing Company and former executive) यांचे बुधवारी दुपारी चार वाजता निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 56 वर्ष होते. गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्यावर पुण्यातील पूना रुग्णालयात उपचार सुरू होते. किडनी स्टोनच्या उपचारासाठी त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
ADVERTISEMENT

पुणे: मेहता पब्लिशिंग कंपनीचे संचालक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे माजी कार्यकारी सुनील मेहता ( Sunil Mehta, director of Mehta Publishing Company and former executive) यांचे बुधवारी दुपारी चार वाजता निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 56 वर्ष होते. गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्यावर पुण्यातील पूना रुग्णालयात उपचार सुरू होते. किडनी स्टोनच्या उपचारासाठी त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी होत गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचे पार्थिव गुरुवार (13 जानेवारी) रोजी मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सीईओ आणि एमडी सुनील अनिल मेहता यांनी 1986 मध्ये वडील अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली होती.
मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापना आणि विकास त्यांनी लहानपणापासूनच पाहिला आणि वडिलांचा हा व्यवसाय अधिक वाढवला.
मराठीत अनुवादित परदेशी आणि प्रादेशिक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. याशिवाय त्यांनी ई-बुक सेवाही सुरू केली. भारतातूनच नव्हे तर जगभरातून मराठीत अनुवादित उत्तमोत्तम साहित्यकृती त्यांनी मिळवल्या आणि मराठी वाचकांसाठी अनुवादित पुस्तकांचे मोठे दालन तयार केले.