ते कधीच अशा गोष्टींवर बोलत नाहीत; सुप्रिया सुळेंचं नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

Lakhimpur Kheri Violence : 'हा सरकारने शेतकऱ्यांवर केलेला हल्ला; कुणीही चुकीच्या गोष्टी करत नव्हते'
ते कधीच अशा गोष्टींवर बोलत नाहीत; सुप्रिया सुळेंचं 
नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार सुप्रिया सुळे. (संग्रहित छायाचित्र)Reuters

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाचे पडसाद आजही उमटताना दिसत आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगलं असून, त्यांच्या मौनावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया यांनी टोला लगावला आहे. ते कधीच अशा घटनांवर बोलत नाहीत', असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर भूमिका मांडली.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर खीरी येथील घटनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी हा राज्य सरकारने केलेला हल्ला असल्याचं सांगत मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

'न्यायालयाने जे सांगितलं ते बरोबरच आहे. लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोक शांततेनेच आंदोलन करत होते. कुणीही चुकीच्या गोष्टी करत नव्हते. व्हिडीओ जर बघितला, तर शांततेत आंदोलन करताना अंगावर गाडी घालण्यात आली आहे', असं सु्प्रिया सुळे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार सुप्रिया सुळे. (संग्रहित छायाचित्र)
लखीमपूर खीरी हिंसाचार : नियोजित हल्ला करून शेतकऱ्यांची हत्या; राहुल गांधींचा गंभीर आरोप

'गांधीजींनी जे स्वातंत्र्य मिळवलं, ते शांततेच्याच मार्गानं मिळवलं. शेतकरी बांधव तोच प्रयत्न करत होते. त्यांच्या ज्या रीतीने हल्ला झाला, तो उत्तर प्रदेश सरकारकडून झालेला आहे. शेतकऱ्यांनी केलेला नाही', असं मत सुळे यांनी मांडलं.

कायद्यांना स्थगिती दिलेली असताना आंदोलनाची गरज आहे का? न्यायालयानं म्हटलं आहे. याबद्दलही बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'स्थगिती असं नाही. मागणी कायदे रद्द करण्याची आहे. मागणीच पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आंदोलन करत आहेत. सरकारने न्यायालयात नीट बाजू मांडली नसावी. कदाचित चुकीची माहिती दिल्यामुळे गैरसमज झालेला असावा.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार सुप्रिया सुळे. (संग्रहित छायाचित्र)
लखीमपूर खीरी : व्हिडीओच समोर आलाय, आता तरी दोन अश्रू ढाळा -शिवसेना

इतकं सगळं घडत असताना पंतप्रधान मौन बाळगून आहेत. त्यांच्या 'मन की बात' वेगळीच आहे, असं काही वाटतंय का?, असा प्रश्न माध्यमांनी सुळे यांना केला. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'ते कधीच अशा गोष्टींवर बोलत नाहीत. बलात्काराची घटना घडली, तेव्हाही ते काही बोलले नव्हते. त्यामुळे मला याबद्दल काही आश्चर्य वाटत नाही', असं सांगत खासदार सुळे यांनी मोदींवर निशाणा साधला.

Related Stories

No stories found.