घरबसल्या घ्या, राज्यातल्या प्रमुख देवस्थानांचं दर्शन
घटस्थापनेच्या मुहुर्तावर सरकारने आज राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली केली आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजच्या दिवसानिमीत्त खास सजावट करण्यात आली होती. कोल्हापूर प्रमाणे तुळजाभवानी मंदिराचा गाभाराही आज खास आणि आकर्षक फुलांनी सजवला होता. नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं मंदिरही आज भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रशासनाने मंदिरं उघडण्याची परवानगी दिली आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या […]
ADVERTISEMENT

घटस्थापनेच्या मुहुर्तावर सरकारने आज राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली केली आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजच्या दिवसानिमीत्त खास सजावट करण्यात आली होती.
कोल्हापूर प्रमाणे तुळजाभवानी मंदिराचा गाभाराही आज खास आणि आकर्षक फुलांनी सजवला होता.
नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं मंदिरही आज भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रशासनाने मंदिरं उघडण्याची परवानगी दिली आहे.
सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची इथे योग्य पद्धतीने सोय पहायला मिळाली नाही. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा सोडा अनेकांनी मास्कही घातला नव्हता.
मुंबईतल्या मुंबादेवीच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक दर्शन घेतलं.
तिकडे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही आज खास तुळशीच्या पानांची सजावट करण्यात आली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आजच्या दिवसानिमीत्त खास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरातही आज भाविकांसाठी खुलं करण्यात आलं असून ठराविक भाविकांना प्रत्येकदिवशी दर्शन मिळणार आहे.