टीईटी परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तारांचं नाव का आलंय?; काय आहे नेमकं प्रकरण?
आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवणार असं थेट ठाकरेंना आव्हान देणारे राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार वेगळ्याचं कारणामुळे वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण ठरलं टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा. याच प्रकरणामुळे सत्तारांचं नाव चर्चेत आलं असून, त्यावर सत्तारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र राज्य […]
ADVERTISEMENT

आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवणार असं थेट ठाकरेंना आव्हान देणारे राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार वेगळ्याचं कारणामुळे वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण ठरलं टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा. याच प्रकरणामुळे सत्तारांचं नाव चर्चेत आलं असून, त्यावर सत्तारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. आरोग्य भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करीत असतानाच हा शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) घोटाळा उघडकीस आला होता.
टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्यानं राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. या घोटाळ्यात राज्य परीक्षा परिषदेचे बडे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्यांच्या संचालकांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. पैसे देऊन टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची यादीच पोलिसांनी तयारी केली आहे. याच यादीमुळे आता टीईटी परीक्षेचं कनेक्शन सिल्लोडपर्यंत पोहोचल्याची चर्चा राज्यभरात सुरू झालीये.
TET Scam : पैसे देऊन शिक्षक झालेल्यांच्या नोकऱ्या जाणार?; ७,८८० जणांची यादी तयार