ठाकरे सरकारच्या हातालाच नाही तर बुद्धीलाही लकवा मारला आहे-चंद्रकांत पाटील
स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली ठाकरे सरकारच्या हाताला नाही तर बुद्धीलाही लकवा मारला आहे. कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत कारण त्यांची बुद्धीच चालत नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. शरद पवारांनी दिलेलं उदाहरण देत त्यांनी ही टीका केली आहे. […]
ADVERTISEMENT

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली
ठाकरे सरकारच्या हाताला नाही तर बुद्धीलाही लकवा मारला आहे. कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत कारण त्यांची बुद्धीच चालत नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. शरद पवारांनी दिलेलं उदाहरण देत त्यांनी ही टीका केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे कुठली फाईल गेली तर ती वाचायचे. मग खिशातून पेन बाहेर काढून टोपण उघडायचे, पुन्हा टोपण लावून घ्यायचे. सही करू की नको, या मानसिकतेत शेवटी ते टोपण बंद करून पेन पुन्हा खिशात ठेवून द्यायचे. शरद पवारांना जेव्हा त्यावेळी याबाबत विचारलं गेलं तेव्हा या सरकारच्या हाताला लकवा मारला गेला आहे असं त्यांनी म्हटलं होतं. धोरण लकवा अर्थात पॉलिसी पॅरेलिसीस हा या सरकारला आहे असंही शरद पवार म्हणाले होते. तेच उदाहरण देऊन मी सांगतो आहे की ठाकरे सरकारच्या बुद्धीलाही लकवा मारला गेला आहे.