तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपच्या अडचणी आणखी वाढणार, ‘हे’ आहे कारण
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि फिल्म डायरेक्टर अनुराग कश्यप हे दोघेही सध्या इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. अनुराग आणि तापसीच्या घरी काल इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तापसी आणि अनुराग यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांचीही जवळपास सहा तास चौकशी केली. दरम्यान या प्रकरणात दोन वेगवेगळ्या केसेस […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि फिल्म डायरेक्टर अनुराग कश्यप हे दोघेही सध्या इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. अनुराग आणि तापसीच्या घरी काल इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तापसी आणि अनुराग यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांचीही जवळपास सहा तास चौकशी केली.
दरम्यान या प्रकरणात दोन वेगवेगळ्या केसेस आहे. इन्कम टॅक्स विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सर्च ऑपरेशनदरम्यान प्रॉडक्शनमधील गैरव्यवहारासंदर्भात पुरावे मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामधून दोन वेगवेगळी प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये एक फँटम फिल्मच्या शेअरहोल्डर्स विरोधात आहे आणि दुसरं प्रकरण हे अभिनेत्री तापसी पन्नूच्या विरोधात आहे. तापसी पन्नू आणि तिच्या कंपनी विरोधात 25 करोड रूपयांच्या आयकर बुडवल्याचा आरोप आहे. तिच्या कंपनीवर देखील आयकर बुडवल्याचा आरोप केला आहे.