उस्मानाबाद जिल्ह्यातील हे गाव 6 दिवस जळत होते; रझाकारांचा प्रमुख कासीम रिझवीच्या भाच्याने केला होता कारस्थान

मुंबई तक

देश स्वातंत्र्य झाला तरी मराठवाडा 13 महिने पारतंत्र्यात होता. याठिकाणी निजामांचं राज्य होतं. निजामशाहीत रझाकार नावाची क्रूर संघटना होती. ज्याचा कासीम रिझवी हा प्रमुख होता. याच रझाकार संघटनाने उस्मानाबाद जिल्ह्यासह इतर ठिकाणी हैदोस माजवला होता. ज्या गावात निजामाच्या विरोधात चळवळ उभी राहिली, ते संपूर्ण गाव जाळण्याचा क्रूर कारस्थान रझाकारांनी केला होता. अशीच एक घटना उस्मानाबाद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देश स्वातंत्र्य झाला तरी मराठवाडा 13 महिने पारतंत्र्यात होता. याठिकाणी निजामांचं राज्य होतं. निजामशाहीत रझाकार नावाची क्रूर संघटना होती. ज्याचा कासीम रिझवी हा प्रमुख होता. याच रझाकार संघटनाने उस्मानाबाद जिल्ह्यासह इतर ठिकाणी हैदोस माजवला होता. ज्या गावात निजामाच्या विरोधात चळवळ उभी राहिली, ते संपूर्ण गाव जाळण्याचा क्रूर कारस्थान रझाकारांनी केला होता. अशीच एक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवधानोऱ्यात घडली होती. या घटनेमुळे या गावचे नाव देवधानोराऐवजी जळकं धानोरा, असं पडलं आहे.

भारत स्वातंत्र्य झाल्यापासून निजामाच्या राजवटीत स्वातंत्र्य संग्रामासाठीची चळवळ जोर धरू लागली होती. देवधानोऱ्यात देखील प्रभातफेरी काढणे, तिरंगा फडकवणे, भारताचा जय जयकार करणं सुरु झालं. त्यामुळं बाजूच्याच बोरवटी गावात राहणाऱ्या कासीम रिझवीचा भाचा गुंडूपाशा याचा या गावावर राग होता. इतर गावांप्रमाणे धानोरा गावातील लोक त्याला भीक घालत नव्हते. त्यामुळे या गावांवर त्याचा डोळा होता. म्हणून तो नेहमी या गावात येत जात असे.

रझाकारांना भीक घालायची नाही, गावकऱ्यांचं एकमत

देवधानोरा गावात इतर गावापेक्षा जास्त पैलवान होते. तसंच स्वातंत्र्यासाठी या गावातील अनेक तरुण पुढे आले होते. रझाकारांच्या अधिकाऱ्यांना वाकून आदाब करण्याचा फतवा होता. मात्र या गावातील लोकांनी रझाकारांना सलाम, आदाब करायचं नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आदाब केला नाही म्हणून एका सर्कल अधिकाऱ्याने येथील एकाला बुटाने खूप मारले होते. त्यावेळी अनेक गावकरी पुढे सरसावले होते. म्हणून गुंडू पशाचा राग आणखी वाढला होता.

संगीत बारीचं कारण सांगून घातला हैदोस

तो दिवस होता 17 एप्रिल 1948 रोजीचा. गुंडूपाशाने काही ना काही कारण काढून या गावाला अद्दल घडवायची, असे पक्के होते. त्यामुळे त्याने संगीत बारी करण्याच्या बहाण्याने काही लोकांना गावात पाठवलं. काही शेतकऱ्यांचा वेशात रझाकार गावात बैलगाडी घेऊन आले. बैलगाडीत कडब्याखाली बंदुका लपवल्या होत्या. संगीत बारीला गावच्या लोकांनी विरोध केला. गावात अजिबात नाचण्याचा कार्यक्रम होणार नाही, अशी भूमिका पोलीस पाटलांनी घेतली.

हे वाचलं का?

    follow whatsapp