संसार सुरळीत चालवण्यासाठी तो चोर बनला, नागपूर पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संसार सुरळीत चालावा यासाठी घरात नवरा-बायको मेहनत आणि काबाडकष्ट करताना आपण अनेकदा पाहिलं असेल. परंतू नागपुरात एका व्यक्तीने आपला संसार सुरळीत चालावा यासाठी चोरीचा मार्ग पत्करला आहे. या अट्टल चोराला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेला मुद्देमालही जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव पंकज उरकुडे असं असून तो महाकाली नगर, बेलतरोडी इथे राहतो. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संसाराचा गाडा सुरळीत चालू रहावा यासाठी आपण चोरीचा मार्ग स्विकारल्याचं पंकजने कबुल केलं. पंकजला त्याच्या चोऱ्यांमध्ये साथ देणारा प्रणव ठाकरे हा त्याचा सहकारी सध्या फरार आहे.

आरोपी पंकज उरकुडेने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यासोबत लग्न केलं. दोघेही वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथे भाड्याने एक खोली घेऊन राहत होते. जवळचे पैसे संपत चालल्यानंतर पंकजने चोरीचा मार्ग स्विकारला. नागपुरात सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे वकील निलेश शर्मा यांच्या घरी २९ डिसेंबरला घरफोडी करत पंकजने १ लाख रोखरक्कम आणि ४ मोबाईल चोरले. या प्रकरणी सोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी तपासादरम्यान सोनगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच एका गुन्ह्याची नोंद झाल्याचं कळलं. यानंतर पोलिसांनी विविध पथकं स्थापन करत या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. निलेश शर्मा यांच्या घरातून चोरी केल्यानंतर मिळालेल्या पैशातून पंकजने एक गाडी खरेदी केली होती. या गाडीचा वापर तो चोरीच्या कामांमध्ये करायचा. पोलिसांनी ही गाडीही जप्त केली असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT