प्रतापगडावरच्या अफझल खानाच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम हटवलं, कलम १४४ लागू

१५०० पोलीस प्रतापगड परिसरात तैनात, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त
Unauthorized construction near Afzal Khan's tomb on Pratapgad removed, Section 144 enforced
Unauthorized construction near Afzal Khan's tomb on Pratapgad removed, Section 144 enforced

प्रतापगड परिसरात असलेल्या अफझल खानाच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. चार जिल्ह्यातले १५०० हून अधिक पोलीस साताऱ्यात दाखल झाले आहेत.

बुधवारी रात्रीपासूनच अतिक्रमण हटवण्याची तयारी

अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच अतिक्रमण पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली होती. शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे शिवप्रताप दिनी अवतीभोवती अनेक हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुका मध्ये दाखल झाले होते मात्र पोलिसांनी याबाबत कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली आहे.

144 कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.

 Preparations for demolition of encroachments had started from Wednesday night itself
Preparations for demolition of encroachments had started from Wednesday night itself

१५०० पोलिसांचा बंदोबस्त घटनास्थळी तैनात

प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण बुधवारी पहाटे तब्बल १५०० पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हटवण्यात आले. शिंदे - फडणवीस सरकारने केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकने खळबळ उडाली असून परिसरात १४४ कलम जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबवली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानाची कबर आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्या परिसरात इतर काही प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यातून अनेकदा वाद - प्रतिवाद सुरू होता. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचे विषय ऐरणीवर आले होते.

बुधवारी मात्र सातारा पोलिसांनी इतर चार जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त मागवला. रात्री उशिरा हा बंदोबस्त आल्यानंतर पहाटे चोख बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आले.

प्रतापगडाच्या पायथ्याशी सुरू असलेले अफझल खानच्या कबरीचे उदात्तीकरण थांबविण्यासाठी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिवभक्तांचे आंदोलन उभे केले होते. याची दखल घेऊनच अफझल खानाच्या कबरीचा परिसर बंद करण्यात आला होता. आता या ठिकाणी असलेलं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं आहे. तसंच या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in