मोठी बातमी: मुंबईकरांना रेड अलर्ट, शाळा-कॉलेजच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय
मुंबईत पुढील 24 तासात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे मुंबई महापालिकेने उद्या (27 जुलै) शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT

Updated news in Marathi मुंबई: मुंबईत (Mumbai) आज (26 जुलै) दुपारपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. तसंच पुढील 24 तासात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) आता शाळा-महाविद्यालयांना सुट्टी (School-College Holiday) जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरात मागील आठवड्यापासून पावसाचा जोरदार बॅटिंग सुरू आहे. उद्या देखील अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने आता सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. (very heavy rain in mumbai in next 24 hours mumbai municipal corporation bmc announced holiday schools colleges mumbai news in marathi)
अति मुसळधार पावसाचा इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
भारतीय हवामान खात्याच्या (मुंबई) वतीने, मुंबई महानगराला आज (26 जुलै) रात्री 8 ते उद्या (27 जुलै) दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुटी जाहीर केली आहे.
हे ही वाचा>> No Confidence Motion : पराभव निश्चित… तरीही मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव का?
तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.









