राहुल गांधींना भाजप नेत्याची धमकी, जालन्यात काँग्रेसचा तीव्र विरोध
जालन्यात काँग्रेस पक्ष आक्रमक, राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमकीवर जोरदार निदर्शने.
ADVERTISEMENT
जालन्यात काँग्रेस पक्ष आक्रमक, राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमकीवर जोरदार निदर्शने.
Rahul Gandhi Death Threat : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमकीबाबत जालन्यात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील महात्मा गांधी चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. भाजप नेते तरविंदर सिंग मारवा यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर जालन्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याचा निषेध करत तरविंदरसिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार कैलास गोरंट्याल यांनी खासदार राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT