वाशिम : अल्पवयीन विद्यार्थ्याला पाय चेपायला बोलावून शिक्षकाने केला अनैसर्गिक अत्याचार
–जका खान, वाशिम राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच वाशिम जिल्ह्यात शिक्षकाने विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारंजामध्ये ही घटना घडली असून, एका नराधमाने शिक्षकी पेशालाच काळीमा फासला आहे. वाशिम जिल्ह्याच्या कारंजातील एका शाळेत वेदपठणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने विध्यार्थ्यांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. शाळेतील एका विद्यार्थ्यानेच […]
ADVERTISEMENT

–जका खान, वाशिम
राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच वाशिम जिल्ह्यात शिक्षकाने विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारंजामध्ये ही घटना घडली असून, एका नराधमाने शिक्षकी पेशालाच काळीमा फासला आहे.
वाशिम जिल्ह्याच्या कारंजातील एका शाळेत वेदपठणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने विध्यार्थ्यांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
शाळेतील एका विद्यार्थ्यानेच अत्याचारांची वाच्यता केली असून, या 12 वर्षीय विध्यार्थ्यांने केलेल्या आरोपावरून शिक्षक अजय पाठक याच्याविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.