डोंबाऱ्याच्या खेळात आम्हाला रस नाही, ही तर नळावरची भांडणं: शिवसेना-भाजपला ‘आप’ने फटकारलं

मुंबई तक

अझान, हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या विषयावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच गाजत आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष समोरासमोर आले असून प्रत्येक दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळत आहेत. आम आदमी पक्षाने या घडामोडींवर टीका करताना ही तर सेना-भाजपची नळावरची भांडणं असून आम्हाला या डोंबाऱ्याच्या खेळात रस नसल्याचं सांगितलं आहे. शिवसेना आणि भाजप हे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अझान, हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या विषयावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच गाजत आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष समोरासमोर आले असून प्रत्येक दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळत आहेत. आम आदमी पक्षाने या घडामोडींवर टीका करताना ही तर सेना-भाजपची नळावरची भांडणं असून आम्हाला या डोंबाऱ्याच्या खेळात रस नसल्याचं सांगितलं आहे.

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष गेली 27 वर्ष एकत्र नांदले. आता त्यांच्यात सुरु असलेली भांडणं ही नळावरची भांडणं आहेत. या डोंबाऱ्याच्या खेळात जनतेला कोणताच रस नाही, असं मत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते कल्याण-डोंबिवलीत पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.

Navneet Rana, Ravi Rana : नवनीत राणा, रवि राणांनी जामीन न घेण्याची भूमिका का बदलली?

महाविकास आघाडी ही तीन चाकांचं सरकार आहे. त्यातलं एक चाक पंक्चर झालं तर दुसरं चाक फिट नाहीये आणि तिसऱ्या चाकामध्ये हवा कमी आहे. या तिन्ही पक्षांना सरकार नीट चालवता येत नाहीये. महागाईने होरपळलेल्या जनतेला, बेरोजगारीने होरपळलेल्या जनतेला आणि कोविडमुळे स्वतःच्या घराचं अर्थकारण कोलमडून पडलेल्या जनतेला या आशा डोंबाऱ्याच्या खेळात काहीच इंटरेस्ट नाहीये. सर्वसामन्यांना आता दिलासा हवा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp