अजित पवार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण तसंच आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीय. अशातच विरोधी पक्ष भाजपकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जातेय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आणि या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. मोदी सरकारमधल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण तसंच आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीय. अशातच विरोधी पक्ष भाजपकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जातेय.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आणि या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. मोदी सरकारमधल्या एका मंत्र्यानेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्याने या घडामोडींना मोठं गांभीर्य प्राप्त झाल्याचं दिसलं.

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, राष्ट्रपती राजवटीची जे लोक मागणी करत आहेत, त्यांना सत्ता मिळाली नाही. कदाचित त्यामुळेच विरोधी पक्षांकडून अशी मागणी केली जातेय.

अजित पवार पुढे म्हणाले, ‘अधिवेशनाच्या काळातही मी राष्ट्रपती राजवटीच्या विरोधकांच्या मागणीबद्दल बोलले. सुधीर मुनगंटीवार हे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपती राजवट हाच मुद्दा घेऊन बसले होते. पण मी त्यांना राष्ट्रपती राजवटीशिवाय तुमच्याकडे दुसरा मुद्दा आहे, की नाही, असं विचारलं.’

हे वाचलं का?

    follow whatsapp