उदयनराजेंनी मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांकडे ही मागणी केली

मुंबई तक

मुंबई तक : भाजपाकडून राज्यसभेवर गेलेले खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणात वडीलकीच्या नात्याने लक्ष घाला अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. राज्यसभेवर गेल्यानंतर उदनयराजे हे पहिल्यांदा पवार यांना भेटले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणात वडीलकीच्या नात्याने लक्ष घालावे, या संबंधीच्या खटल्यामध्ये कोणत्याही प्रकराचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये. त्यासाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई तक : भाजपाकडून राज्यसभेवर गेलेले खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणात वडीलकीच्या नात्याने लक्ष घाला अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. राज्यसभेवर गेल्यानंतर उदनयराजे हे पहिल्यांदा पवार यांना भेटले होते.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणात वडीलकीच्या नात्याने लक्ष घालावे, या संबंधीच्या खटल्यामध्ये कोणत्याही प्रकराचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये. त्यासाठी तशा सक्त सुचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी पवारांकडे केली. वेगवेगळ्या मुद्यांवर श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश राज्य सरकारला देण्याची विनंतीही शरद पवार यांना केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत नेमकं काय काय झालं आहे याबाबतही श्वेतपत्रिकेत दखल घेण्याची मागणी उदयनराजे यांनी केली.

दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना आरक्षणाबाबत राज्य सरकारने गंभीरपणे लक्ष न दिल्यास उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला. नवी दिल्ली येथील जनपथ या पवारांच्या निवासस्थानी खा. उदयनराजे हे शरद पवार यांना भेटले. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. आपल्या मागण्यांबाबत त्यांनी खा. शरद पवार यांना विस्तृत निवेदनही दिले.

यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणप्रश्नी पवारांनी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

हे वाचलं का?

    follow whatsapp