भाजपचे 'हेच' का ते साडेतीन नेते? जे आता आहेत महाविकास आघाडीच्या रडारवर

BJP vs Shiv Sena: राज्यातील राजकारणात शह-कटशाहाचं राजकारण सुरु असताना महाविकास आघाडीच्या रडारवर भाजपचे काही नेते आले आहेत. पाहा कोण आहेत हे नेते.
भाजपचे 'हेच' का ते साडेतीन नेते? जे आता आहेत महाविकास आघाडीच्या रडारवर
which are bjp leaders now on the radar of the Mahavikas aaghadi narayan rane nitesh rane neel kirit somaiya(फाइल फोटो)

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक हाय वोल्टेज पत्रकार परिषद घेतली होती. त्याआधी भाजपचे साडेतीन नेत्यांबाबत आपण गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या वगळता कोणाचं फारसं नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे ते साडेतीन नेते कोण याबाबत त्यांनी काहीही खुलासा केला नव्हता. मात्र, राज्यातील राजकारण दिवसागणिक बदलत आहे. अशातच महाविकास आघाडी देखील आक्रमकपणे राजकारण करत असल्याचं या घडीला दिसतं आहे. त्यामुळे आता भाजपमधील साडेतीन नेते कोण? याविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सरकारला मोठा धक्का बसला आहे. मात्र, असं असलं तरी भाजपसमोर झुकायचं नाही असं ठरवून महाविकास आघाडीने आता आक्रमक बाणा स्वीकारला आहे. कारण आता त्यांनीही भाजपच्या काही नेत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम ठेवली आहे.

हेच का साडे तीन नेते?

केंद्रीय यंत्रणांकडून राज्य सरकारमधील अनेक नेत्यांवर धाडसत्र, अटक अशा गोष्टी सुरु असताना आता राज्य सरकार देखील भाजपच्या काही मंत्र्यांच्या अटकेची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र नितेश राणे, भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या हे सध्या महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे हेच का ते साडेतीन नेते अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

पाहा महाविकास आघाडीच्या रडारवर कोणते नेते:

नारायण राणे: मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एकदा अटकेची कारवाई झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मागे आता पुन्हा एकदा चौकशीचा फेरा सुरु झाला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या आरोपांमुळे आता नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याच संदर्भात नारायण राणे यांचा जबाब नोंदवण्यासाठी गुरुवारी (4 मार्च) सकाळी 11 वाजता मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.

नितेश राणे: महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: शिवसेनेच्या रडारवर असलेले दुसरे नेते म्हणजे नितेश राणे. त्यांना देखील काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. पण असं असतानाच आता दिशा सालियन प्रकरणात त्यांना देखील मालवणी पोलिसांनी समन्स बजावलं असून 3 मार्चला त्यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.

किरीट सोमय्या- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात आहे. सोमय्या यांनी काही प्रकरणांमध्ये घोटाळा झाला असल्याचा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे सोमय्या हे देखील शिवसेनेच्या रडारवर आहेत.

सोमय्या यांचे वाधवान बिल्डरशी लांगेबांधे असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच पालघरमध्ये भूखंड घोटाळा केल्याचा आरोप देखील शिवसेनेने केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर राज्य सरकार कायदेशीर कारवाईच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

नील सोमय्या: किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरण आणि पत्रा चाळ भूखंड घोटाळ्यासंबंधी आरोप केले होते. यासंबंधातील कागदपत्र आर्थिक गुन्हे शाखेला आणि ईडीला देणार असल्याचं राऊत म्हणाले होते.

किरीट सोमय्या- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात आहे. सोमय्या यांनी काही प्रकरणांमध्ये घोटाळा झाला असल्याचा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे सोमय्या हे देखील शिवसेनेच्या रडारवर आहेत. सोमय्या यांचे वाधवान बिल्डरशी लांगेबांधे असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच पालघरमध्ये भूखंड घोटाळा केल्याचा आरोप देखील शिवसेनेने केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर राज्य सरकार कायदेशीर कारवाईच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

नील सोमय्या: किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरण आणि पत्रा चाळ भूखंड घोटाळ्यासंबंधी आरोप केले होते. यासंबंधातील कागदपत्र आर्थिक गुन्हे शाखेला आणि ईडीला देणार असल्याचं राऊत म्हणाले होते.

which are bjp leaders now on the radar of the Mahavikas aaghadi narayan rane nitesh rane neel kirit somaiya
नारायण राणेंसह नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या; दिशा सालियन प्रकरणी पोलिसांचं समन्स

आता भाजपच्या या चारही नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी साडेतीन नेते असा ज्यांचा उल्लेख केला होता ते हेच नेते आहेत का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यातील एकणूच राजकारण हे कुरघोडीचं सुरु असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अशावेळी तीन पक्षांना आपलं सरकार टिकविण्यासाठी देखील बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूने सध्या डाव-प्रतिडाव खेळले जात आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in