Janmashtami 2022 जीवापाड प्रेम असूनही भगवान श्रीकृष्णाने राधेशी लग्न का केलं नाही?

तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, मग लग्न का केले नाही?
Radha and lord krishna google image
Radha and lord krishna google image

देशभरात आज 19 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्ठमी साजरी केली जात आहे. जन्माष्ठमीचं पावन पर्व भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. मथुरा वृंदावनचं नाही तर पूर्ण देशभरात जन्माष्ठमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने आम्ही आपल्याला आम्ही श्रीकृष्णांबाबतच्या काही रोचक गोष्टी सांगणार आहोत. राधा आणि श्रीकृष्ण एकमेकांवर इतकं प्रेम करत असताना ते पुढे एकत्र का आले नाही, याबाबत माहिती आपण पाहणार आहोत.

राधा आणि श्रीकृष्ण यांची भेट कशी झाली हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? आपण नेहमीच एक गोष्ट ऐकत आलो की श्रीकृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे आणि श्रीकृष्ण राधाशिवाय अपूर्ण आहेत. पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, मग लग्न का केले नाही? अनेकांना या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. लग्न न झाल्यानंतर दोघांची नेहमी एकत्र पूजा केली जाते.जगात असे काही लोक आहेत जे भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांना आपले प्रेरणास्थान मानतात. जाणून घ्या राधा आणि भगवान कृष्ण यांच्या जीवनातील काही न ऐकलेल्या कथा.

असं सांगितलं जातं की जेव्हा भगवान कृष्ण चार ते पाच वर्षांचे होते तेंव्हा ते त्यांच्या वडिलांसोबत गुरे चारायला जायचे. एकेदिवशी आपल्या वडिलांना आश्चर्यचकित करण्यासाठी त्यांनी वसंत ऋतूमध्ये वादळ आणले. आणि जणू काही आपल्याला माहीत नसल्यासारखे दाखवले. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि कृष्णजी रडू लागले. कृष्णाला रडताना पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना घट्ट मिठी मारली. भगवान श्रीकृष्णाच्या वडिलांना काळजी वाटू लागली, कारण अशा वेळी त्यांना कृष्णाचीही काळजी घ्यावी लागते आणि गायींचीही काळजी घ्यावी लागते. कृष्णाच्या वडिलांना त्याच वेळी एक सुंदर मुलगी येताना दिसली. हे पाहून नंदबाबा शांत झाले आणि त्यांनी मुलीला कृष्णाची काळजी घेण्यास सांगितले. मुलीने कृष्णाची काळजी घेण्यासाठी हो म्हटल्यावर नंदजी गुरांना घेऊन घरी गेले.

भगवान कृष्ण आणि राधाची पृथ्वीवरील पहिली भेट

जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि मुलगी तेथे एकटे होते, तेव्हा कृष्णजी तरुणाच्या रूपात त्या मुलीसमोर प्रकट झाले. ज्याने केशरी रंगाचे कपडे घातले होते, त्याच्या डोक्यावर मोराची पिसे,हातात बासरी होती. कृष्णाजींनी त्या मुलीला विचारले की तिला असा प्रसंग आठवतो का, जेव्हां आपण दोघेही स्वर्गात होतो. ती मुलगी हो म्हणाली. कारण ती भगवान श्रीकृष्णाची राधा होती. अशा प्रकारे पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर दोघेही पहिल्यांदाच भेटले.

भगवान कृष्ण आणि राधा कुठे भेटत असत?

असे मानले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि राधा वृंदावनात भेटत असत. भगवान श्रीकृष्ण दररोज धबधब्याजवळ बासरीची मधुर धुन वाजवत असत आणि तीच मधुर धून ऐकून राधाजी त्यांना भेटायला यायच्या.

भगवान कृष्ण आणि राधा कधीच वेगळे झाले नाहीत

मान्यतेनुसार, राधा भगवान कृष्णापासून कधीही विभक्त होत नाहीत. भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यात प्रेम होते, ते भक्तीचे शुद्ध स्वरूप होते. असेही म्हटले जाते की भगवान कृष्ण आणि राधा ही दैवी स्वरूपाची दोन भिन्न तत्त्वे आहेत.

भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी एकमेकांशी लग्न का केले नाही?

भगवान कृष्ण आणि राधा यांनी एकमेकांशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता कारण त्यांचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. हे सिद्ध करण्यासाठी, प्रेम शरीरावर नाही तर भक्ती आणि शुद्धतेने आहे. दोघांनी एकमेकांशी लग्न न करून प्रेमाची परम भक्ती सर्व जगासमोर ठेवली. असं बोललं जातं की गाय राखणारी असल्यामुळे राधा स्वतःला कृष्णसाठी योग्य समजत नव्हती. त्यामुळे ती लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम होत.

याशिवाय आणखी एक मत आहे की, भगवान श्रीकृष्ण आणि राधा एकमेकांना एक आत्मा मानतात. म्हणूनच तुम्ही स्वतःच्या आत्म्याशी लग्न कसे करू शकता, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in