महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? राजेश टोपे यांनी दिलं अत्यंत महत्त्वाचं उत्तर म्हणाले…
देशात आणि राज्यात कोरोनाची तिसरी लाटही आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. रूग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. ३१ मार्चपासून देशभरातले निर्बंधही संपुष्टात येणार आहेत. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे दोन नियम मात्र असणार आहेत असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अशात महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? हा प्रश्न महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी […]
ADVERTISEMENT

देशात आणि राज्यात कोरोनाची तिसरी लाटही आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. रूग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. ३१ मार्चपासून देशभरातले निर्बंधही संपुष्टात येणार आहेत. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे दोन नियम मात्र असणार आहेत असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अशात महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? हा प्रश्न महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आहेत राजेश टोपे?
”मास्कमुक्तीच्या संदर्भात एक गोष्ट आहे ती अशी आहे, आपल्या देशात कोरोना आटोक्यात आलेला आहे. मात्र दुसऱ्या देशांमध्ये कोरोनाची चौथी लाटही आलेली आहे. त्याचे जे काही परिणाम आपण पाहतो आहोत ते पाहता मास्कमुक्त राज्य करणं हे थोडं धाडसाचं ठरेल. अगदीच मास्क घालायचा नाही हे योग्य नाही. गर्दीच्या ठिकाणी जात असू तिथे मास्क वापरणं आवश्यक आहे. जर आपल्याला कोणताही संसर्ग झाला असेल तर त्यापासून आपला आणि इतरांचा बचाव होऊ शकतो. आपण तूर्तास तरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार केलेला नाही. ज्यावेळी तशी परिस्थिती वाटेल तेव्हा मुख्यमंत्री त्या संदर्भातली घोषणा करतील.”