दरोडा… बलात्कार! इगतपुरी ते कसारा स्टेशनच्या दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

मुंबई तक

इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लूट आणि बलात्काराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली. इगतपुरी ते कसारा स्थानका दरम्यान आरोपींनी अक्षरशः धुडगूस घालत क्रूर कृत्य केलं. रेल्वे नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे. शुक्रवारी (8 ऑक्टोबर) सायंकाळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लूट आणि बलात्काराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली. इगतपुरी ते कसारा स्थानका दरम्यान आरोपींनी अक्षरशः धुडगूस घालत क्रूर कृत्य केलं. रेल्वे नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे.

शुक्रवारी (8 ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं निघालेली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले. एक्स्प्रेसने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते.

नागपूर हादरलं! मित्रानेच केला घात; 17 वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार

प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. 16 प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले. त्यांच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. दरोडेखोर इथेच थांबले नाही, तर त्यांनी पतीसोबत प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp