जयंत पाटील-अजित पवारांमध्ये भाषणावरुन नाराजीनाट्य? शरद पवारांसमोर नेमकं काय घडलं?

मुंबई तक

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक बडे नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. तसेच राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते याठिकाणी पोहचले होते. मात्र या संपूर्ण अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या न झालेल्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली. नेमके काय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक बडे नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. तसेच राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते याठिकाणी पोहचले होते. मात्र या संपूर्ण अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या न झालेल्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली.

नेमके काय घडले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्हिडीओमध्ये दिसून येत असल्याप्रमाणे सुरुवातीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, फौजिया खान अशा राज्यातील नेत्यांसोबत केरळ, लक्षद्वीप, हरयाणा, उत्तरप्रदेश अशा विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांची भाषण झाली. मात्र अजित पवार यांचे नाव भाषणासाठी पुकारण्यात येत नव्हते.

अखेरीस शरद पवार यांच्या भाषणापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी माईक हातात घेवून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दोन मिनिटांमध्ये मनोगत मांडण्याची विनंती केली. यावेळी कार्यकर्त्यांमधून अजित पवार यांना बोलायला द्या अशी मागणी करण्यात आली. तसेच अजित पवार यांच्या नावाच्या समर्थनाच्या घोषणाही देण्यात आल्या. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांनाच भाषण करण्यास सांगितले.

जयंत पाटील भाषणासाठी माईकसमोर उभे राहिल्यानंतरही अजित पवार यांच्याच नावाच्या घोषणा सुरुच होत्या. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, एक-एक स्टेशन येतं असतं. परंतु जयंत पाटील यांचे भाषण सुरु होताच अजित पवार व्यासपीठावरुन खाली आले आणि थेट सभागृहाच्या बाहेरच निघून गेले. जयंत पाटील यांचे भाषण झाल्यानंतर पॉप्युलर डिमांडवर अजित पवार यांना भाषणाची संधी देत आहोत, असं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. मात्र तेव्हा अजित पवार व्यासपीठावर नव्हते.

हे वाचलं का?

    follow whatsapp