Ajit Pawar : अजित पवारांनी पुन्हा काढला निवृत्तीचा मुद्दा, शरद पवारांना आव्हान देत म्हणाले…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar open challenge to sharad pawar ither retire kolhapur maharashtra politics
ajit pawar open challenge to sharad pawar ither retire kolhapur maharashtra politics
social share
google news

राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच वय काढत त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर आता अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दा काढला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी निव्वळ निवृ्त्तीचा मुद्दाच काढला नाही तर त्यांना आव्हान देखील दिले आहे. आता अजित पवारांनी शरद पवारांना काय आव्हान दिले आहे? आणि आता हे आव्हान शरद पवार स्विकारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ajit pawar open challenge to sharad pawar ither retire kolhapur maharashtra politics)

अजित पवार कोल्हापूरात उत्तरदायित्व सभेत बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार ज्या दिवशी पडलं, त्याचवेळेस राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व आमदारांनी, एखाद दुसरा राहिला असेल, परंतू सर्वच्या सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केले होते. हे पत्र नेत्यांना (शरद पवारांना) दिले होते, आणि म्हटलं होतं महायुतीत सामील व्हा,अशी मागणी केली होती.

हे ही वाचा : Aditya L1ने तिसऱ्यांदा कक्षा बदलली, सुर्याच्या किती जवळ पोहोचला?

मी जर हे खोट बोलत असेन तर राजकारणातून निवृ्त्त होईन, आणि खरं असलं तर जे खोट बोलतात त्यांनी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे, असा सल्ला अजित पवारांनी शरद पवारांचं नाव न घेता दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृ्त्तीचा मुद्दा काढल्याची चर्चा आहे. आता शरद पवार अजित पवारांचे हे आव्हान स्विकारतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हो आमच्यावर दबाव होता…

ईडीच्या दबावाने अजित पवार गट सत्तेत गेल्याची टीका होती. या टीकेवर अजित पवार म्हणाले, हो आमच्यावर दबाव होता, आमच्यावर लोकांचा कामे पुर्ण करण्याचा दवाब होता. अडीच वर्षात हाती घेतलेली काम होती, ती पुर्ण करण्याचा आमच्यावर दबाव होता. आमदारांच्या कामावर स्थगिती मिळाली ती उठवण्याचा दबाव होता, यात काय आमची चुक झाली असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच दुसरा कोणताही दबाव नव्हता. आम्ही कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आम्ही पण मराठ्याची आणि शेतकऱ्यांची औलाद असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

कुठेतरी स्व:ताचा सार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष महायूतीत गेला नाही. काम करणाऱ्य़ा प्रतिनिधींना लोकांच्या कामाचा दबाव असतो. आम्हाला लोकांच्या कामाचा दबाव होता,आणि काम करणाऱ्या हातावर हात ठेवून बसत नाही, म्हणून आम्ही सत्तेत गेल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच जर आम्ही काम करतोय तर महाराष्ट्राने आम्हाला पाठिंबा द्यायचा हवा, अशी साद अजित पवारांनी जनतेला घातली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘आमदारकीसाठी राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं’; सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

    follow whatsapp

    ADVERTISEMENT