Andheri By Poll : ठरलं! अंधेरीची जागा भाजपकडेच; उमेदवार नसल्यानं शिंदे गटाची माघार?

मुरजी पटेल उद्या अर्ज दाखल करणार
Eknath shinde, Devendra Fadnavis
Eknath shinde, Devendra FadnavisMumbai Tak

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लटके यांची उमेदवारी आता अंतिम झाली असून त्या उद्या सकाळी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती आमदार अनिल परब यांनी दिली.

दरम्यान, न्यायालयाने लटके यांच्या बाजूने निकाल देताच बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीत अंधेरीची जागा भाजप लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसंच भाजपकडून मुरजी पटेल ही निवडणूक लढणार असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं. दरम्यान विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडे उमेदवारचं नसल्यानं त्यांनी ही जागा भाजपला सोडली असल्याची माहिती आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देण्यास प्रयत्नशील होते. मात्र त्या अखेरपर्यंत ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर शिंदे गटातून मुरजी पटेल यांनाच उमेदवारी देता येते का? याची चाचपणी केली. मात्र त्यातही फारसी यश आलं नाही. त्यामुळे अखेर शिंदे गटाने अंधेरीची जागा भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचीही माहिती आहे.

मुरजी पटेल उद्या फॉर्म भरणार :

भाजप आणि महायुतीचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल उद्या (शुक्रवारी) आशिष शेलार यांच्या उपस्थित अर्ज भरणार आहेत. याबाबतचं एक पोस्टर सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.

काय म्हटलं आहे पोस्टरमध्ये?

लढू.. जिंकू... इतिहास घडवू असं सुरुवातीला या पोस्टरमध्ये ठळक अक्षरात म्हटलं आहे. सोबत १६६ - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीच्या वतीने आपले लाडके नेते आणि अधिकृत उमेदवार श्री मुरजी पटेल (काका) आपला उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित हा अर्ज भरणार आहेत.

स्थान : शेरेपंजाब बीएमसी मैदान, संकट मोचन हनुमान मंदिर जवळ, जिजामाता मार्ग, अंधेरी पूर्व. सकाळी ठिक ९ वाजता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in