Andheri Bypoll : नववी पास मुरजी पटेल कोट्याधीश, क्लर्क राहिलेल्या ऋतुजा लटके लखपती
मुंबई :अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष युतीचे उमेदवार मुरजी पटेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांनी अर्ज दाखल केला आहे. काल (शुक्रवारी) अर्ज भरल्यानंतर आज दोन्ही बाजूंनी […]
ADVERTISEMENT

मुंबई :अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष युतीचे उमेदवार मुरजी पटेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांनी अर्ज दाखल केला आहे. काल (शुक्रवारी) अर्ज भरल्यानंतर आज दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल करतेवेळी निवडणूक आयोगापुढे आपल्या संपत्तीचं विवरण सादर केलं आहे. यानुसार भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे कोट्याधीश आहेत. तर ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या लखपती आहेत. दिवंगत रमेश लटके यांची संपत्ती अद्याप ऋतुजा लटके यांच्या नावावर झालेली नाही. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
मुरजी पटेल आहेत कोट्याधीश :
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुरजी पटेल नववी पास आहेत. मुरजी पटेल आणि कुटुंबियांच्या नावावर एकूण संपत्ती १० कोटी ४१ लाख रुपये आहे. यात स्वतः मुरजी पटेल यांच्या नावावर ५ कोटी ४१ लाख ७१ हजार रुपयांची एकूण संपत्ती आहे. तर पत्नी, अपत्यांच्या नावावर ५ कोटींची संपत्ती आहे. तर मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २ कोटी रुपयांचं कर्ज आहे.
मुरजी पटेल यांच्या नावावर १ लाख ५० हजारांचे शेअर्स, तर एक इनोव्हा गाडी आहे. याशिवाय मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर अंधेरीमध्ये तीन फ्लॅट आहेत. मुरजी पटेल यांच्या नावावर सोनं नाही. तर त्यांच्या पत्नीकडे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. याशिवाय दोघांच्या नावावर मिळून गुजरातमधील कच्छ येथे ६० एकर जमीन आहे. याची सध्याची किंमत ४ कोटी २५ लाख रुपये इतकी आहे.