राज ठाकरेंविरोधात आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या दोन महिन्यांपासून चांगलीच चर्चा आहे. हनुमान चालीसा Hanuman Chalisa आणि भोंग्याविरोधात उभारलेल्या आंदोलनांमुळे राज ठाकरे चर्चेत आहेत. आता राज ठाकरेंशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात सांगलीच्या शिराळा कोर्टाने अजामीन पात्र वॉरंट जारी केलं आहे. २८ एप्रिल २०२२ ला राज ठाकरेंसह १० जणांविरोधात शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या दोन महिन्यांपासून चांगलीच चर्चा आहे. हनुमान चालीसा Hanuman Chalisa आणि भोंग्याविरोधात उभारलेल्या आंदोलनांमुळे राज ठाकरे चर्चेत आहेत. आता राज ठाकरेंशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात सांगलीच्या शिराळा कोर्टाने अजामीन पात्र वॉरंट जारी केलं आहे.
२८ एप्रिल २०२२ ला राज ठाकरेंसह १० जणांविरोधात शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant)बजावलं होतं. त्यासंदर्भातली सुनावणी ८ जून रोजी झाली. या सुनावणीला राज ठाकरे गैरहजर होते त्यामुळे त्यांच्या विरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट काढलं गेलं आहे.
२००८ मध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जे आंदोलन झालं त्या प्रकरणी शिराळा कोर्टाने वॉरंट काढलं होतं. सध्या राज ठाकरे यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्यावर रूग्णालयात शस्त्रक्रियाही होणार होती मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाच्या पेशी आढळल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. याच कारणामुळे राज ठाकरे हे सुनावणीसाठी हजर राहू शकले नाहीत.