अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान; दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोट्स…

मुंबई तक

दिल्लीतील मद्य उत्पादन धोरण घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा आम आदमी पार्टी आणि भाजपमधील संघर्ष वाढत चालला आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे ऑपरेशन लोट्स दिल्लीत अयशस्वी झाल्याचा दावा केला आहे. दिल्लीत भाजपचा सरकार पाडण्याचा कट होता, असे स्पष्टपणे केजरीवाल यांनी सांगितले आहे. सरकार पाडण्यासाठी धाडी टाकण्यात आल्या : केजरीवाल अरविंद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दिल्लीतील मद्य उत्पादन धोरण घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा आम आदमी पार्टी आणि भाजपमधील संघर्ष वाढत चालला आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे ऑपरेशन लोट्स दिल्लीत अयशस्वी झाल्याचा दावा केला आहे. दिल्लीत भाजपचा सरकार पाडण्याचा कट होता, असे स्पष्टपणे केजरीवाल यांनी सांगितले आहे.

सरकार पाडण्यासाठी धाडी टाकण्यात आल्या : केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून लिहिले की, दिल्लीत ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे. सीबीआय आणि ईडीच्या धाडीच मद्य उत्पादन धोरण याचा आणि भ्रष्टाचाराशी काही संबंध नाही? दिल्लीतील ‘आप’ सरकार पाडण्यासाठीच हे छापे पडले? जसे त्यांनी इतर राज्यात केले आहे तसं दिल्लीत ते करू पाहत होते, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

मनिष सिसोदियांचा दावा

हे वाचलं का?

    follow whatsapp