फडणवीससाहेब एकटे औरंगाबादमध्ये फिरलात तर लोक हंड्याने मारतील-इम्तियाज जलील

मुंबई तक

औरंगाबाद शहरातला पाणी प्रश्न पेटला आहे. अशात MIM चे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच एक आव्हान दिलं आहे. तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात एकटे फिरून दाखवा लोक तुम्हाला हंड्याने मारतील असं जलील यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले आहेत इम्तियाज जलील? (Imtiaz Jaleel) पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले होते. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

औरंगाबाद शहरातला पाणी प्रश्न पेटला आहे. अशात MIM चे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच एक आव्हान दिलं आहे. तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात एकटे फिरून दाखवा लोक तुम्हाला हंड्याने मारतील असं जलील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत इम्तियाज जलील? (Imtiaz Jaleel)

पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले होते. त्यांनी पाणीपट्टी अर्धी केली. मात्र असं करून पाणी मिळणार आहे का? पैसे पूर्ण घ्या मात्र आम्हाला पाणी द्या अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस येत आहेत, त्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील दोघेही नौटंकी करून जाणार. हे सगळं करू नका. दोघेही एकटे तुमचा नगरसेवक असलेल्या भागात एकटे, कोणतेही संरक्षण न घेता, कार्यकर्ते आणि नेते न घेता जाऊन आम्ही पाण्यावर बोलणार आहे. असं सांगा, मग बघा आई-बहिणी तुम्हाला रिकाम्या हंड्याने मारहाण करतील अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp