चर्चा तर होणारच! स्मिता ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सध्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली आहे. अशातच स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

Eknath Shinde ” ….तेव्हा बाळसाहेब ठाकरेंना खऱ्या अर्थाने दुःख झालं असेल”

मागच्या अनेक वर्षांपासून स्मिता ठाकरे या राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र युतीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं आणि जेव्हा मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी स्मिता ठाकरे या राजकारणात येऊ इच्छित होत्या. त्यांचा राजकारणात दबदबा होता असंही बोललं गेलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्या राजकारणातून बाजूला गेल्या अशाही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Eknath Shinde : “अन्यायाविरोधात पेटून उठा या बाळासाहेबांच्या विचारांवर आमची वाटचाल”

स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर म्हटलं आहे?

मी एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. एकनाथ शिंदे हे सच्चे कार्यकर्ते आहेत. जुने शिवसेनिक आहेत. शिवसेनेत त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांचा आणि माझा अनेक वर्षांचा परिचय आहे. ते मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे मी त्यांना भेटायला आणि शुभेच्छा द्यायला आले आहे. त्यावेळी स्मिता ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की शिवसेनेत दोन गट पडले आहेत त्याकडे कसं पाहता? यावर मी राजकारणात सक्रिय नाही. सदिच्छा भेट घ्यायला आले होते असं स्मिता ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

२१ जूनला शिवसेनेत बंड झालं. एकनात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत हे बंड पुकारलं. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वापासून फारकत घेतली त्यांनी भाजपसोबतच जायला हवं होतं ही नाराजी सांगत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदार यांनी उठाव केला. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिंदे फडणवीसांचं सरकार राज्यात आलं कारण भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. या सगळ्या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना सातत्याने धक्के दिले जात आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या १२ खासदारांनीही आपला गट स्थापन करत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी पक्षाला नवसंजीवनी मिळावी म्हणून शिव संवाद यात्राही काढली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखतही घेतली आहे. त्याच दरम्यान स्मिता ठाकरे यांनी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणं हा चर्चेचा विषय ठरतो आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT