Bharat Ratna: लालकृष्ण अडवाणींमुळे वाचलेली मोदींची खुर्ची.. जाणून घ्या त्यांच्या नात्याची संपूर्ण कहाणी
LK Advani-PM Modi Relation : 2003 मध्ये गुजरात दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ‘राजधर्म’ पूर्ण करू न शकल्यामुळे नरेंद्र मोदींकडून राजीनामा घेण्यावर ठाम होते. पण त्याचवेळी लालकृष्ण अडवाणींनी मोदींना वाचवलं होतं.
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना आज (3 फेब्रुवारी) मोदी सरकारने भारतरत्न (Bharat Ratna)पुरस्कार जाहीर केला. पण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra ModI) यांच्यातील राजकीय कहाणी ही फारच रंजक आहे.. ती नेमकी कशी हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमावणार होते, तेव्हा लालकृष्ण अडवाणींनी त्यांची खुर्ची वाचवली होती. पण नरेंद्र मोदींमुळेच अडवाणींना पंतप्रधान पदाला मुकावं लागलं.. (bharat ratna narendra modi chief ministership saved by lk advani know the full story of their relationship)
2012 नंतर नात्यात येऊ लागला दुरावा
गुजरातच्या मुख्यमंत्री पदी मोदींना कायम ठेवण्यात अडवाणींची मोठी भूमिका होती. तेव्हापासून 2012 पर्यंत मोदी हे अडवाणींच्या लेफ्टनंटच्या भूमिकेत होते, पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नवा चेहरा असल्याची चर्चा जसजशी जोर धरू लागली, तसतसे अडवाणी आणि मोदी यांच्यातील अंतर वाढू लागले. 2013 पर्यंत दोघांमधील संबंध इतके ताणले गेले होते की, पुढच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याच्या प्रस्तावाला अडवाणींनी कडाडून विरोध केला. पण त्याकडे दुर्लक्ष करत पक्षाने 13 सप्टेंबर 2013 रोजी, भाजपने शेवटी नरेंद्र मोदी यांना 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.
10 वर्षांत सारं काही बदललं
विशेष म्हणजे 2003 मध्ये गुजरात दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ‘राजधर्म’ पूर्ण करू न शकल्याने नरेंद्र मोदींकडून राजीनामा घेण्यावर ठाम होते. पण त्यावेळी मोदींचे सर्वात मोठे समर्थक लालकृष्ण अडवाणी त्यांना म्हणाले होते, ‘असे करू नका, अराजक होईल.’ 10 वर्षांनंतर 2013 मध्ये तेच लालकृष्ण अडवाणी भाजप आणि आरएसएसला मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवू नका अशी विनंती करत होते. तेव्हा अडवाणींना उत्तर मिळाले ‘आणखी उशीर झाला तर अराजक माजेल.’
असे काय झाले की संपूर्ण चक्र फिरलं आणि भाजपचे भीष्म पितामह आपल्या आवडत्या शिष्यावर नाराज झाले. अडवाणींच्या मोदींवरील नाराजीची ही पाच महत्त्वाची कारणे असू शकतात-










