शिवाजीराव आढळराव पाटलांचं गणित चुकलं, आता भाजप करणार ‘करेक्ट कार्यक्रम’?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. राज्यात ठाकरे सरकार आलं, पण या नव्या सरकारमुळे शिवसेनेत सर्वाधिक अडचण झाली, ती शिवाजीराव आढळराव पाटलांची! राष्ट्रवादीमुळे आढळरावांचा शिरूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा कमजोर झाला होता. त्यामुळे शिवसेनेतल्या फाटाफुटीत सुरवातीला तळ्यात-मळ्यात करत आढळरावांनी शिंदे गटात उडी मारली. भाजपसोबत काम सुरू केलं. नव्या जोमाने कामाला लागले. अशातच आता […]
ADVERTISEMENT

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. राज्यात ठाकरे सरकार आलं, पण या नव्या सरकारमुळे शिवसेनेत सर्वाधिक अडचण झाली, ती शिवाजीराव आढळराव पाटलांची!
राष्ट्रवादीमुळे आढळरावांचा शिरूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा कमजोर झाला होता. त्यामुळे शिवसेनेतल्या फाटाफुटीत सुरवातीला तळ्यात-मळ्यात करत आढळरावांनी शिंदे गटात उडी मारली. भाजपसोबत काम सुरू केलं. नव्या जोमाने कामाला लागले. अशातच आता शिंदे गटात जाऊनही आढळरावांचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. आणि याला कारण ठरलंय, ते भाजपचं मिशन २०२४.
भाजपच्या ‘मिशन १४४’ मध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांचा मतदारसंघ
भाजपनं दोन वर्षाआधीच लोकसभा २०२४ चं मिशन हाती घेतलंय. त्यासाठी जोरदार तयारी केली जातेय. केंद्रीय मंत्री पाठवून भाजपेत्तर खासदार असलेल्या मतदारसंघात आव्हान उभं केलं जातंय. शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघातही भाजपचे मंत्री मुक्काम ठोकत आहेत. शिरूरची जबाबदारी केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांच्या खांद्यावर देण्यात आलीय.
Shiv Sena : उद्धव ठाकरेंना भिडणाऱ्या संजय शिरसाटांना एकनाथ शिंदेंनी पुन्हा डिवचलं?