‘पत्रकारांना ढाब्यावर न्या’, चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले? कारणही सांगितलं

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

in a party workers meeting chandrashekhar bawankule do controversial statement
in a party workers meeting chandrashekhar bawankule do controversial statement
social share
google news

BJP Chandrashekhar Bawankule controversy : ‘पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवायचं म्हणजे समजलंच असेल तुम्हाला.’ हे विधान आहे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं. याच विधानामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. बावनकुळेंच्या विधानावर बोट ठेवत विरोधकांनी त्यांना घेरलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी बावनकुळेंवर टीकेचे बाण डागलेत.

झालं असं की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत 24 सप्टेंबरला अहमदनगरमध्ये ‘महाविजय 2024’ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठक पार पडली. या बैठकीत बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना कोणता सल्ला दिला?

बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना एक विधान केलं. ते म्हणाले, ‘ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावं. आपण एवढं चांगलं काम करतोय, पण हे असं टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. एक दोन पोर्टलवाले प्रिंटवाले, इलेक्ट्रॉनिकवाले असतील त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवायचं म्हणजे समजलंच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे आहेतच. महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजे याची काळजी घ्या.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘…अन्यथा मुख्यमंत्री व्हायचं केवळ स्वप्न राहतं’, अजित पवार असं का बोलले?

बावनकुळेंच्या हे विधान माध्यमांमधून समोर आलं. सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यांची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

विजय वडेट्टीवारांचा बावनकुळेंना उलट सवाल

बावनकुळेंच्या या विधानावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. विरोधकांनी यावरून बावनकुळेंना घेरलं असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी बातमी ट्विट करत थेट सवाल केलाय.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महिला आरक्षण विधेयकाला AIMIM चा विरोध का? असदुद्दीन ओवेसींनी सांगितलं कारण

वडेट्टीवार म्हणतात, “चंद्रशेखर बावनकुळे जी, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का? देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, इडी सीबीआय सारख्या संस्थांचा धाक दाखवूनही भाजप विरुद्ध आवाज दबत नाही आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेला सुद्धा चिरीमीरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की…. पण जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे.”

ADVERTISEMENT

बावनकुळेंनी काय केला खुलासा?

“मी असंच म्हटलं. इतकं चांगलं काम आपण करतो. मोदीजींनी नऊ वर्षात इतकं चांगलं काम केलं. चांद्रयान, महिला आरक्षण बिल आलं. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे, तरीही निगेटिव्ह बातम्या येतात. पत्रकारांसोबत बसा. त्यांचा सन्मान करा. त्यांच्याकडे चहा घ्यायला जा किंवा तुम्ही त्यांना बोलवा. त्यांना खरी वस्तुस्थिती सांगा.”

हेही वाचा >> Shiv Sena MLAs : ‘ते काम आमचं की विधानसभा अध्यक्षांचं?’ ठाकरेंचा कोर्टात खडा सवाल

“शेवटी पत्रकार हे आपल्या व्यवस्थेत चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना खरं सांगणं, त्यांना खरंखोटं पटवून देणं. पत्रकारांकडील इनपूट घेणं. कारण पत्रकार समाजातील खरं सांगतात. त्यांच्यासोबत चांगलं वागा. जे बूथ दिलेत, त्या बूथबद्दल पत्रकारांची मतं घ्या. शेवटी पत्रकार खूप महत्त्वाचे असतात. कारण ते समाजाचं मत, मन बदलवू शकतात. तेही एक मतदार आहेत. त्यांनाही एक मत आहे. त्यांच्याबद्दल पक्षपाती का वागता. त्यामुळे त्यांना विचारा, असा सल्ला मी दिला. त्यात काही वाईट नाही. मला वाटतं हे चुकीचं आहे. मी असं म्हटलं की आपल्याविरोधात चुकीच्या बातम्या नसतात”, असा खुलासा बावनकुळेंनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT