ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा! भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपनं माघार घेण्यचा निर्णय घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. रमेश लटकेंच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. ही निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपनं सुरुवातीला घेतली होती. भाजपकडून मुरजी […]
ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपनं माघार घेण्यचा निर्णय घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय.
रमेश लटकेंच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. ही निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपनं सुरुवातीला घेतली होती. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर निवडणुकीला वेगळं वळणं मिळालं होतं.
राज ठाकरे, शरद पवार आणि प्रताप सरनाईक यांनी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केल्यानंतर भाजप माघार घेईल, अशीच चर्चा सुरू झाली होती. त्यानुषंगाने चर्चा सुरू होती.
‘ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण…’, ठाकरेंनी मानले पवारांचे आभार, राज ठाकरेंबद्दल मौन