एकनाथ शिंदेंचा पुन्हा घराणेशाहीकडे कल : कॅप्टन अभिजीत अडसूळांवर मोठी जबाबदारी

मुंबई तक

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आणि दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी अडसूळ यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते. अडसूळ यांनी यापूर्वी आमदार तसेच विभागप्रमुखपद भूषवले आहे. आनंदराव अडसूळ माजी खासदार आणि सध्याचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आणि दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी अडसूळ यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते. अडसूळ यांनी यापूर्वी आमदार तसेच विभागप्रमुखपद भूषवले आहे.

आनंदराव अडसूळ माजी खासदार आणि सध्याचे शिंदे गटाचे नेते :

एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर सर्वाधिक आमदार आणि खासदार आपल्याकडे असल्याचे सांगत थेट शिवसेनेवर दावा केला. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यात आनंदराव अडसूळ यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय आनंदराव अडसूळ हे शिवसेनेकडून तब्बल 5 वेळा खासदार राहिले आहेत.

शिंदे गटाच्या युवासेनेतही ‘घराणेशाही’

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी नुकतीच युवासेनेची नवी कार्यकारणी घोषित केली. पण शिंदेंच्या सेनेने घोषित केलेल्या या नवी कार्यकारणीत सर्वसामान्य तरुणांपेक्षा आमदारांच्या चिरंजींवांचीच वर्णी लागल्याचे दिसून येतं आहे.

अविष्कार भुसे, अभिमन्यू खोतकर, विकास गोगावले, दीपेश म्हात्रे, समाधान सरवणकर, राज सुर्वे, प्रयाग लांडे हे सगळेच नवनियुक्त सदस्य हे अनुक्रमे कॅबिनेट मंत्री दादा भुसे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार भरत गोगावले, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार दिलीप लांडे या बडया नेत्यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे शिंदेंच्या युवासेनातही घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आल्याची प्रतिक्रिया सोशल मिडीयावर उमटत आहे.

युवा सेना कार्यकारणी सदस्य

उत्तर महाराष्ट्र :अविष्कार भुसे

मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे

पश्चिम महाराष्ट्र : किरण साली, सचिन बांगर

कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक

ठाणे, नवी मुंबई व पालघर :

नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे

मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे

विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

हे वाचलं का?

    follow whatsapp