उद्धव ठाकरेंसोबत ‘फक्त वंचित शक्ती’ : नव्या आघाडीची आठवलेंकडून खिल्ली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ramdas Athawale criticized Shivsena – Vanchit Bahujan Aaghadi Alliance

पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी किती ही प्रयत्न केला तरी आंबेडकरी मतदार आमच्याचसोबत राहणार आहे. शिवशक्ति भीमशक्ति म्हणता येणार नाही. ही तर शिव शक्ति आणि वंचित शक्ति म्हणता येईल अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या युतीची खिल्ली उडवली. (Ramdas Athawale criticized Shivsena – Vanchit Bahujan Aaghadi Alliance)

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सोबत १८ ते २० टक्के शिवसेना राहिली असून त्यांची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळे आता त्यांची धडपड सुरू झाली आहे. हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला असला तरी शिवशक्ति-भीम शक्ति म्हणता येणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवशक्ति आणि भीम शक्तिचा प्रयोग झाला होता. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळाल आहे. पण खरी भीम शक्ति आपल्या सोबत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आल्याने भाजप, शिंदे गट आणि आरपीआय या आमच्या महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही. तसंच आम्हाला आगामी निवडणुकीत प्रचंड यश मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Jayant Patil: ‘वंचित’बद्दल NCP सकारात्मक! मातोश्रीवर काय झाली चर्चा?

तसंच मंत्री आठवले पुढे म्हणाले की शिंदे आणि फडणवीस सरकारचा लवकरच मंत्री मंडळ विस्तार होईल. त्यामध्ये आरपीआयला निश्चित स्थान दिलं जाईल असं आश्वासन मिळालं आहे. तसेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये एक जागा आरपीआयला मिळावी. शिवाय महामंडळ आणि विविध समित्यावर कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

भाजपने आरपीआयला दुर्लक्षित करू नये : रामदास आठवले

शिंदे फडणवीस सरकारच्या अनेक कार्यक्रमात आरपीआयचा उल्लेख टाळला जातो. त्यावरून आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे भाजप सोबत आले आहे, ती चांगली गोष्ट आहे. भाजपने आरपीआयचं नाव घेतलं पाहिजे. आरपीआय सुरुवातीपासून सोबत आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेला युती म्हणून ओळख होती. पण आरपीआय सोबत आल्याने महायुती म्हणून ओळख मिळाली आहे. त्यामुळे आरपीआयला दुर्लक्षित करू नये. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा खासदार कसे झाले होते?

आरपीआयच अधिवेशन शिर्डीत होणार : रामदास आठवले

आगामी निवडणुका लक्षात आरपीआयमध्ये सर्व समाजातील कार्यकर्ता येण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन शिर्डीत अधिवेशन घेणार आहे. त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित मंडळींना मार्गदर्शन करतील असं आमचं नियोजन असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT