“उद्धवजींना आमदार सोडून गेलेत, उद्योजक का जाणार नाहीत?”; भाजपचं वर्मावर बोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. झालेल्या बंडखोरीवरून शिंदे गट आणि भाजपकडून सातत्यानं ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवलंय.

‘उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणंघेणं नव्हतं. ते बोलत नाहीत म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले, तर त्यांच्या काळात उद्योजक महाराष्ट्राबाहेर का जाणार नाहीत?’, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना काढला.

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, ‘राज्यात गुंतवणूक व्हायची असेल, तर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री अठरा महिने मंत्रालयात फिरकले नाहीत. वरिष्ठ सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पहावी लागे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मिशन बारामती’ भाजपच्या अजेंड्यावर : आणखी एका केंद्रीय मंत्र्यांचा दौरा संपन्न

राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकार जबाबदार -बावनकुळे

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार यांना आणि काँग्रेस पक्षाला सांभाळण्यात जात होता. त्यांनी स्वतःला बंदिस्त केले होते. ते कोणाला बोलण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्यांच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका होत नव्हत्या. उद्योगांना जागा दिली जात नव्हती. करार होत नव्हते. पर्यावरण परवानग्या दिल्या जात नव्हत्या. उद्योजकांचे शंकानिरसन केले जात नव्हते. यामुळे महाविकास आघाडी सरकारमुळे एकेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे’, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

ADVERTISEMENT

भारत जोडो यात्रेबद्दल चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात आली असताना त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होण्याच्या ऐवजी काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कोल्हापूरमध्ये काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी सातारा, ठाणे, मीरा भाईंदर अशा ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांची यात्रा राज्यात असताना काँग्रेस कार्यकर्ते भाजपत का प्रवेश करत आहेत, हा त्या पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे’, असं म्हणत बावनकुळे यांनी भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

राणे-केसरकरांनी एकत्र येत सावंतवाडीत उडवला महाविकास आघाडीचा धुव्वा

‘भाजपत निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ आहे आणि नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. भाजपमध्ये आम्ही सत्तेसाठी नाही तर राष्ट्रासाठी आणि विचारासाठी काम करतो. हीच पक्षातील सर्वांची भूमिका आहे. गटातटाचे राजकारण करणाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाही’, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT