संजय राऊतांच्या ईडी कारवाईवरती मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला म्हणाले, ते तर…
मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आज सकाळापासून ईडीच्या अधिकाऱ्यांच्या फेऱ्यात आहेत. भांडूपमधिल मैत्री या निवासस्थानी सकाळाची ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. संजय राऊत कारवाईला सहकार्य करत नसल्याचे ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या सर्व कारवाईवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) प्रतिक्रिया आली आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आज सकाळापासून ईडीच्या अधिकाऱ्यांच्या फेऱ्यात आहेत. भांडूपमधिल मैत्री या निवासस्थानी सकाळाची ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. संजय राऊत कारवाईला सहकार्य करत नसल्याचे ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या सर्व कारवाईवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) प्रतिक्रिया आली आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
”संजय राऊतांवरती अजून कारवाई सुरु आहे. ते तर म्हणत होते मी चौकशीला सामोरा जाणार आहे, मग कर नाही त्याला डर कशाला. ते तर महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. संजय राऊतांनी ट्विट केले होते की कितीही दबाव टाकला तरी भाजपकडे जाणार नाही. यावर मुख्यमंत्री म्हणाले ईडी कारवाईच्या भितीने जर कोणी शिवसेना आणि भाजपमध्ये येत असेल तर त्यांनी येऊ नये. आम्हाला दबाव टाकून कोणालाही पक्षात घ्यायचं नाही. ईडीच्या कारवाईला घाबरुन आमच्या पक्षात येण्याचं पुण्याचं काम करु नका.” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
”ईडी चौकशीचं काम करत आहे. जर ईडी केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करतंय असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी सुप्रिम कोर्टात जावं असंही एकनाथ शिंदे म्हणाले. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल तुम्ही काळजी करु नका असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
संजय राऊत यांच्यामागे ज्यामुळे ईडीचा फेरा लागला, ते पत्रा चाळ प्रकरण काय?










