PM मोदींसमोर ठाकरे पिता-पुत्रांचे वाभाडे; शिंदेंचं कौतुक : फडणवीस म्हणाले…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांची बीकेसी मैदानावर जाहीर सभाही पार पडली. (dcm devendra fadnavis talk on uddhav thackeray and aditya thackeray in […]
ADVERTISEMENT

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांची बीकेसी मैदानावर जाहीर सभाही पार पडली. (dcm devendra fadnavis talk on uddhav thackeray and aditya thackeray in front of narendra modi)
याच सभेत पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भाषण झाली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांसमोरच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे वाभाडे काढले. तर मुख्यमंत्री शिंदे यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे आणि मुंबईकरांचे पंतप्रधान मोदींवर विशेष प्रेम असल्याचं सांगितलं. मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या लोकप्रियतेबाबत कुठली स्पर्धा होऊ शकत नाही. मात्र त्यांची लोकप्रियता मोजायची झाली तर ती मुंबईत सर्वाधिक आहे. हे दाव्याने सांगू शकतो, असंही फडणवीस म्हणाले.