एकनाथ शिंदेंच्या कालच्या पत्रावर उपाध्यक्ष झिरवाळांचे स्पष्टीकरण, म्हणाले शिंदेंकडे...

एकनाथ शिंदेंनी काल ३४ आमदारांच्या सहीचे एक पत्र उपाअध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले होते.
एकनाथ शिंदेंच्या कालच्या पत्रावर उपाध्यक्ष झिरवाळांचे स्पष्टीकरण, म्हणाले शिंदेंकडे...
Narhari ZirwalMumbai Tak

मुंबई: एकनाथ शिंदेंनी काल ३४ आमदारांच्या सहीचे एक पत्र उपाअध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना पाठवले होते. यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती गंभीर आरोप केले होते. त्यावर आता नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने मला पाठवलेल्या ठरावाच्या पत्रावर ३४ आमदारांच्या सह्या आहेत. परंतु शिवसेनेच्या आमदारांची संख्या स्थिर नाही, असे महाराष्ट्र विधानसभेचे उपअध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. झिरवाळ म्हणाले, “हे पत्र जरी खरे असले तरी त्याची सत्यता मला तपासायची आहे.''

ते पुढे म्हणाले, “ आमदार नितीन देशमुख यांनी दावा केला आहे की मी इंग्रजीत स्वाक्षरी करतो, परंतु ठराव पत्रावर मराठीत स्वाक्षरी आहे. या ठरावावर उपस्थित सर्व आमदारांनी स्वाक्षरी करत केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. परंतु त्या ठरावावर माझी सही नसल्याचे नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. इतर आमदारांचेही असेच काही आहे का हे तपासून पाहावे लागणार आहे.”

Narhari Zirwal
एकनाथ शिंदे गटाचा ठराव; ठाकरे सरकारवरती गंभीर आरोप, 'त्या' पत्रात नेमकं काय?

काल एकनाथ शिंदेंनी सुनील प्रभू यांना प्रतोद पदावरुन हटवून आमदार भरत गोगावले यांची नियुक्त केली होती. त्यावर बोलताना झिरवाळ म्हणाले “मुख्य व्हीपची नियुक्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा तो पक्षाचा गटनेता असेल. सध्या, नेत्यांचा गट अस्तित्वात आहे की नाही हे स्पष्ट नाही. “नियम पुस्तकेनुसार फक्त पक्षाचे अध्यक्ष गटनेते नियुक्त करू शकतात. मुख्य व्हीपच्या नियुक्तीसाठी सर्व आमदारांनी उपस्थित राहणे आवश्यक नाही. उद्धव ठाकरे यांनी कायद्यानुसार त्यांच्या पक्ष शिवसेनेसाठी नवीन मुख्य व्हीप नेमण्यासाठी मला पत्र दिले होते. म्हणून मी त्यांचा विचार केला. ”

आमदारांना एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यास भाग पाडले जात असल्याच्या चर्चांवर उपसभापती म्हणाले, “आमदारांना गुवाहाटीत राहण्यास भाग पाडले जात असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. मात्र स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी आहेत, त्यांची चौकशी केली जाईल. त्यांना बळजबरीने नेले आहे का? यावर मी भाष्य करू शकत नाही.”

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in