राज्यपालांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले : वादावर फडणवीस आणखी काय म्हणाले?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, होते आणि अनेक पिढ्यांचे आदर्श राहतील. त्यांची बरोबरी, त्यांची तुलना या देशामध्ये आणि राज्यामध्ये होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळेंसोबतच आता या वादावर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ७१ व्या ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिपचा समारोप कार्यक्रम आज पुण्यात पार पडला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

फडणवीस म्हणाले, एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, या पृथ्वीवर आहे. तो पर्यंत महाराष्ट्राचे, देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत सांगायच झालं तर छत्रपती शिवाजी महाराजाच हिरो आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. राज्यपालांच्या मनात देखील काही शंका नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यपालांच्या बोलण्याचे निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. मला एक वाटतं की, त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श देशात आणि महाराष्ट्रात असू शकत नाही, अशीही भूमिका त्यांनी मांडली.

सुधांशु त्रिवेदी यांनी देखील विधान केले असून त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर ते म्हणाले की, सुधांशु त्रिवेदी याच म्हणणं मी नीट ऐकलं असून, कोणत्याही वक्तव्यामध्ये महाराजांनी माफी मागितली, असे म्हटलेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

पोलीस बदल्यांवर फडणवीस काय म्हणाले?

राज्यातील पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्या अद्याप ही झाल्या नाहीत. त्यावर फडणवीस म्हणाले की, जे बदलीस पात्र आहे त्या सर्वांच्या बदल्या निश्चित होतील. जे बदलीस पात्र नाहीत त्यांच्या बदल्या होणार नाहीत. पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यंतरी बदल्या झाल्या, त्यामध्ये उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांनी टीईटी घोटाळा समोर आणल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे. त्यावर नियमांनुसार बदल्या केलेल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

पोलिसांकरीता स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार :

71 वा ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिप स्पर्धा महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी चांगली झाली. 2019 मध्ये पोलिसांकरीता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करण्याच ठरवलं होते. पण त्यावेळी दुर्देवाने सरकार देखील गेले आणि कोविड देखील आला. त्यामुळे तो प्रस्ताव मंजुरीला पडलेला असुन आम्ही त्याला तात्काळ मान्यता देत असल्याचे त्यांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT