शेतकरी कर्जमाफीवर एकच पर्याय, तो म्हणजे…; देवेंद्र फडणवीस सांगितला उपाय
महाराष्ट्रातील सत्तांतर, आगामी महापालिका निवडणुका, भाजपचं मिशन 2024, या आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘मुंबई Tak बैठक’च्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak ला खास मुलाखत दिली. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. महाराष्ट्राची जीडीपी वाढ आणि कर्ज यावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बघितली, तर […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सत्तांतर, आगामी महापालिका निवडणुका, भाजपचं मिशन 2024, या आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘मुंबई Tak बैठक’च्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak ला खास मुलाखत दिली. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.
महाराष्ट्राची जीडीपी वाढ आणि कर्ज यावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बघितली, तर स्थिर अर्थव्यवस्था असलेल्या राज्यांमध्ये आपलं राज्य आहे. वाढीचा दर बघितला तर देशाच्या ग्रोथ रेट बरोबर आहे. कोविड काळ सोडला तर आपला राज्याचा विकासदर वाढत आहे. आपल्यानंतरची तीन चार राज्य आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही.”
“कर्जाचा डोंगर सांगितलं जातं पण, आपला जीएसपीटी भरपूर आहे. केंद्र आणि आरबीआयने 25 टक्क्यांची मर्यादा घालून दिलीये आणि आपली 15 टक्केच आहे. त्यापलीकडे आपण कर्ज घेतलेले नाही. ज्या घोषणा केलेल्या आहेत. मला अर्थशास्त्राची आवड आहे. त्यामुळे सादर केलेले बजेट सर्वसमावेशक आहे.”
“मागे मी मुख्यमंत्री असताना मागेल त्याला शेततळ्याची योजना आणली. शेतकरी जे मागेल, त्याला आपण ते देणार आहोत. शेतीसाठी खूप मोठ्या तरतुदी केल्या आहेत. मागच्या काळात आम्ही म्हणायचो होऊ शकतं, लोक म्हणायचे होऊ शकत नाही. आम्ही ते केलं.”