संभाजी भिडे भेटले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना; टिपू सुलतान जयंतीवरून दिला इशारा
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे सातत्यानं वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत आहेत. आता भिडेंनी टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतलीये. त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि निवदेनही दिलंय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले. महिला पत्रकाराला तू टिकली लावून ये नंतर तुझ्याशी बोलतो, असं म्हटल्यानं संभाजी भिडे टीकेचे […]
ADVERTISEMENT

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे सातत्यानं वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत आहेत. आता भिडेंनी टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतलीये. त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि निवदेनही दिलंय.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले. महिला पत्रकाराला तू टिकली लावून ये नंतर तुझ्याशी बोलतो, असं म्हटल्यानं संभाजी भिडे टीकेचे धनी ठरताहेत. त्याच्या या विधानावरून राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता संभाजी भिडेंनी टिपू सुलतान जयंतीला विरोध केलाय.
झालं असं की, संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत शुक्रवारी (४ नोव्हेंबर) बाईक रॅली काढण्यात येणार होती. मात्र, या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली.
टिकली लाव मग बोलेन! संभाजी भिडे महिला पत्रकाराला असं का म्हणाले?