Hemant Soren: Jharkhand च्या राजकारणात भूकंप, मुख्यमंत्र्यांनाच अटक, ‘हे’ होणार नवे CM!
Hemant Soren News Live: हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून त्यांना ईडी कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे. आता त्यांच्या जागी नव्या मुख्यमंत्री निवड ही करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Jharkhand CM Hemant Soren News: रांची: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात पोहोचल्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला देखील आहे. आता त्यांच्या जागी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन (Champai Soren) यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचलनालया (ED) कडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. (earthquake in jharkhand politics chief minister hemant soren will be arrested by ed champai soren will be the new cm)
याआधी मंगळवारी मुख्यमंत्री सोरेन हे 40 तासांनंतर अचानक दिल्लीहून रांचीला पोहोचले होते. सोरेन यांनी दिल्ली ते रांची असा 1250 किमीचा प्रवास कारने केला होता. येथे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहयोगी आमदारांची भेट घेतली होती. या बैठकीला सीएम सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या. या बैठकीत पुढील रणनीतींवर चर्चा झाल्याचे जेएमएमचे म्हणणे आहे. याच बैठकीत चंपई सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं आहे.
आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला: चंपाई सोरेन
राजभवनातून बाहेर पडताना झारखंडचे नवे भावी मुख्यमंत्री चंपई सोरेन म्हणाले की, ‘आम्ही राज्यपालांसमोर सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आम्ही 43 आमदारांच्या पाठिंब्याने गेलो होतो.’ झामुमोचे आमदार आलमगीर म्हणाले की, ‘आम्ही 43 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर केली आहेत. राज्यपालांनी आम्हाला लवकरच बोलावू असे सांगितले आहे.’
हेमंत सोरेन सध्या ईडीच्या ताब्यात
हेमंत सोरेन सध्या ईडीच्या ताब्यात असल्याचा दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार महुआ माझी यांनी केला आहे. ईडीच्या टीमसोबत ते राजीनाम्यासाठी राजभवनात गेले होते, तिथे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी चंपई सोरेन यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात यावं यासाठी पत्र देण्यात आलं आहे. नवीन मुख्यमंत्री चंपई यांचा शपथविधी आजच झाला पाहिजे, अशी JMM पक्षाची मागणी आहे. अशा परिस्थितीत राजभवनाबाहेर आमदारांचा गोंधळ सुरूच आहे.










