Eknath Khadse : ‘अजित दादांच्या निर्णयावर फडणवीसांची सही’, एकनाथ खडसेंनी काय सांगितलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

eknath khadse criticize ajit pawar devendra fadnavis jalgaun sabha maharashtra politics
eknath khadse criticize ajit pawar devendra fadnavis jalgaun sabha maharashtra politics
social share
google news

Eknath Shinde Criticize Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाची जळगावात स्वाभिमान सभा पार पडतेय. या सभेतून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी डायलॉग बाजी करून अजित दादांना लक्ष्य केलं आहे. ‘क्या हालत बना दी दादा तुमने…’ यहा तो शेर थे, पक्षात किंमत होती.पण सरकारमध्ये असताना देखील प्रत्येक फाईल फडणवीसांकडे घ्यावी लागत असेल तर तुमच्या स्वाभिमान गेला कुठे ? असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना डिवचलं आहे. (eknath khadse criticize ajit pawar devendra fadnavis jalgaun sabha maharashtra politics)

एकनाथ खडसे यांनी जळगावच्या सभेतून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.अजित दादा एक स्मार्ट माणूस,बोलेल तसे करणार माणूस, काम करणारा माणसू, पक्ष बदलल्यानंतर स्वाभिमानी अजित दादा निर्णय घ्यायला लागले. निर्णय़ झाला, स्वाक्षरीही झाली. पण देवेद्र फडणवीसांनी त्यांचा निर्णय़ रदद् करून टाकला., केवढा तो अपमान…असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘… तर मराठ्यांना आरक्षण देणं शक्य’; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितला कायदा

सरकारमध्ये अजित दादांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे.अजित दादांनी निर्णय घेतला तर त्यावर देवेंद्र फडणवीसांची सही लागणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सही करणार आहे, अशी माहिती खडसे देत म्हणाले, ‘क्या हालत बना दी दादा तुमने’, ‘यहा तो शेर थे , पक्षात किंमत होती.जर प्रत्येक फाईल फडणवीसांकडे घ्यावी लागत असेल तर तुमच्या स्वाभिमान गेला कुठे ? असा सवाल खडसेंनी अजित पवारांना केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Morcha : ‘…तरच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या’, विजय वडेट्टीवारांची भूमिका काय?

किती खोटारडा माणूस आहे. तर मी राजकारण सोडून देईन. राजकारण सोडलं का? विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. लग्न केलं की नाही केलं. एकही शब्द दिलेलं काम केले नाही. आणि आज तोच शब्द घेऊन मराठा समाजाला मुर्ख बनवण्याचे काम यांच्या माध्यमातून सुरू असल्याची टीका एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता केली आहे.

मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतोय. पण एका बाजूला आरक्षण द्यायचं असे मान्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला केंद्रावर ढकलायचं. पण राज्य असो किंवा केंद्र सरकार असो, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठ्यांना 16 टक्के आरक्षण द्यायचं आहे, त्याची राज्याने केंद्राकडे शिफारस करावी, केंद्राने घटनेत दुरूस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, यासाठी प्रयत्न करावे, असे देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT