Sanjay Raut: एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भाजपमध्ये मनानं, तनानं आणि धनानं विलीन झाले

शिवसेना खासदार संजय राऊत यांची एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटावर टीका
Shivsena MP Sanajay Raut Criticized Eknath Shinde and His Group
Shivsena MP Sanajay Raut Criticized Eknath Shinde and His Group Mumbai Tak

२१ जूनला शिवसेनेत बंड झालं आणि ते आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. कारण शिवसेना सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी गाठलं. त्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री झाले. असं असलं तरीही हे सगळे आमदार आम्ही शिवसेनेत आहोत असंच सांगत आहेत. भाजप नेतेही आम्ही मूळ शिवसेनेसोबत युती केली आहे हे सांगत आहेत. आता याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Shivsena MP Sanajay Raut Criticized Eknath Shinde and His Group
Eknath Shinde : "वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, रेडा, कुत्रे म्हणायचं, आणि..."

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचा गट हे भाजपमध्ये तनानं, मनानं आणि धनानं विलीन झाले आहेत. आम्ही शिवसैनिक आहोत हे ते फक्त तोंडाने सांगत आहेत. त्याला काहीही अर्थ नाही असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचं वेगळं अस्तित्व नाही, त्यामुळे ते हेच सांगत आहेत की आम्ही अजून शिवसेनेत आहोत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदार शिवसेनेत नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे भाष्य केलं आहे.

Shivsena MP Sanajay Raut Criticized Eknath Shinde and His Group
Narayan Rane :"शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा"

शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आहे. आमचा शिवसैनिक आमच्याशी एकनिष्ठ आहेत. आमदार गेले, माजी नगरसेवक गेले तरीही हरकत नाही शिवसैनिक आमच्यासोबतच आहे आणि आमच्यासोबतच राहिल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेले आमदार यांना आम्ही शिवसेनेत आहोत हे सांगावंच लागणार आहे. कारण शिवसेना सोडली असं तांत्रिकदृष्ट्या मान्य केलं तर लगेच त्यांची आमदारकी जाईल. कोर्टातही जाण्याची गरज लागणार नाही. आम्ही शिवसैनिक नाही हे त्यांनी मान्य करावं किंवा शिवसेनेने दिलेल्या आमदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं असंही आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि गटाला दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यानंतर घडलेलं सत्तांतर महाराष्ट्राने पाहिलं. यानंतर शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. ठाणे आणि नवी मुंबईतल्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर मुंबईतही अशी फाटाफूट होऊ शकते. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण राहणार की नाही याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हे ठणकावून सांगितलं की धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे आणि तो आपल्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in