देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं; एकनाथ शिंदे काय म्हणाले?
शपथविधीकडे नजरा लावून असलेल्या राज्यातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची भूमिका आणि आमदारांच्या मतदारसंघातील […]
ADVERTISEMENT

शपथविधीकडे नजरा लावून असलेल्या राज्यातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची भूमिका आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. जवळपास ५० आमदार एकत्र आहोत. एक वैचारिक भूमिका, राज्याचा विकास घेऊन पुढे जाणार आहोत.”
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंना विकास कामे आणि अडचणींची माहिती दिली. चर्चा केली. जी काही नैसर्गिक युती होती. आपण एकत्र निवडणुका लढवल्या. याबद्दल बोललो. महाविकास आघाडी स्थापन झाली. पण मतदारसंघाचे प्रश्न आणि निवडणुकांत येणाऱ्या अडचणी बघितल्या, तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडे जात असल्याचं दिसलं.”
“राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही मंत्रिमंडळातील सहकारी, त्यांच्यावर झालेल्या कारवाया. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. त्यातील काही निर्णय झाले आहेत आणि त्याचं स्वागत आम्ही करतो,” असं शिंदे म्हणाले.