‘धर्मवीर’मधल्या नथुराम गोडसेचा कात्री लावलेल्या सीनसह काय होते एकनाथ शिंदेंच्या बंडाचे संकेत?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातल्या राजकारणात आलेला भूकंप आता शमला आहे. २१ जूनपासून एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाची चर्चा चांगलीच रंगली होती. याच दरम्यान एका सिनेमाचीही चर्चा रंगली होती. या सिनेमाचं नाव होतं धर्मवीर: मुक्कामपोस्ट ठाणे. हा सिनेमा एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आणि शिवसेनेचे एकेकाळचे दिग्गज नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित होता.

धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातच एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयीचे संकेत लपलेले होते. जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळू शकले नाही अशी चर्चा आता या सगळ्यानंतर रंगली आहे. आजतकने या सिनेमाशी संबंधित काही बड्या नावांशी चर्चा केली. तसंच हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की हे संकेत नेमके काय होते?

सिनेमाच्या रिलिजचं टायमिंग

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धर्मवीर हा सिनेमा महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाच्या साधारण एक ते सव्वा महिना आधी आणला गेला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मात्र या सिनेमातला बहुतांश भाग हा एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेत उदय कसा झाला ते कसे मोठे झाले हे दाखवणारा आहे. या सिनेमात काम करण्याची ऑफर मिळालेल्या एका अभिनेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगितलं आहे की त्याला हा सिनेमा सोडावा लागला कारण त्याच्याकडे डेट्स नव्हत्या. त्या अभिनेत्याने हेही सांगितलं की निर्मात्याला सिनेमा मे महिन्यातच रिलिज करायचा होता.

हा सिनेमा मार्चमध्ये तयार होण्यास सुरूवात झाली आणि मे महिन्यात तो रिलिजही झाला. इतक्या रेकॉर्ड वेळेत हा सिनेमा का पूर्ण केला जातो आहे हा प्रश्न सिनेमा ऑफर आलेल्या अभिनेत्यालाही पडला. त्याने हे सांगितलं की निर्माता हा सिनेमा मे महिन्यात का रिलिज करू इच्छित होता ते कळलं नव्हतं. कारण मे महिन्यात आनंद दिघे यांची पुण्यतिथी, जयंती काहीही नसतं. तसंच शिवसेनेचाही वर्धापन दिन नसतो. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतले बडे नेते आहेत. धर्मवीर हा सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर या सिनेमाच्या प्रमोशनला एकनाथ शिंदे महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी गेले होते. त्याचा फायदा या सिनेमाला झाला. महाराष्ट्रात या सिनेमाची चर्चा चांगलीच रंगली.

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरेंचं आक्रमक हिंदुत्व

ADVERTISEMENT

धर्मवीर हा सिनेमा आनंद दिघे यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. या सिनेमात आनंद दिघे हे हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसतात. ९० च्या दशकात भिवंडी आणि राबोडी या ठिकाणी झालेल्या जातीय दंगलींचा संदर्भही या सिनेमात दाखवण्यात आला आहे. त्यातून शिवसेना हिंदुत्वासाठी किती कट्टर होती हेदेखील ठसवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून उद्धव ठाकरे कसे दूर गेले हे देखील वारंवार सांगितलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंचं आक्रमक हिंदुत्व

धर्मवीर हा सिनेमा आनंद दिघे यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. या सिनेमात आनंद दिघे हे हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसतात. ९० च्या दशकात भिवंडी आणि राबोडी या ठिकाणी झालेल्या जातीय दंगलींचा संदर्भही या सिनेमात दाखवण्यात आला आहे. त्यातून शिवसेना हिंदुत्वासाठी किती कट्टर होती हेदेखील ठसवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून उद्धव ठाकरे कसे दूर गेले हे देखील वारंवार सांगितलं आहे.

नथुराम गोडसे नाटकाचा वगळलेला सीन

मराठी नाटक मी नथुराम गोडसे बोलतो आहे हे नाटक महात्मा गांधी यांची हत्या आणि नथुरामची त्यामागची भूमिका सांगणारं आहे. या नाटकावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. या नाटकावर हा ठपका ठेवण्यात आला आहे की या नाटकात नथुरामचं उदात्तीकरण करण्यात आलं आहे. जेव्हा हे नाटक भरात होतं तेव्हा शिवसेनेने या नाटकाला पाठिंबा दिला होता. एवढंच नाही तर आनंद दिघे हे या नाटकाला पाठिंबा देण्यासाठी सर्वात पुढे होते.

नथुराम गोडसे या नाटकाशी संबंधित एक सीन या चित्रपटात होता. नथुराम गोडसे नाटक, त्यासंबंधीची शिवसेनेची आणि आनंद दिघेंची भूमिका यासंदर्भातलं हे दृश्य होतं. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकात नथुराम हे पात्र साकारणाऱ्या शरद पोंक्षे यांनीही हे सांगितलं आहे की धर्मवीर सिनेमात हे दृश्य होतं जे नंतर वगळण्यात आलं.

शरद पोंक्षे यांनी याबाबत सांगितलं की नाटकाशी संबंधित एक सीन चित्रीत करण्यात आला होता. मात्र रिलिजच्या वेळी मला दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलं की सिनेमाची लांबी वाढल्याने हा सीन काढण्यात आला आहे. या सिनेमाचा सिक्वेल येईल त्यात हा सीन दाखवला जाईल. सूत्रांनी याबाबत दिलेली माहिती मात्र अशी आहे की शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने हा सीन हटवण्यास सांगितलं होतं. या नेत्याचं म्हणणं होतं की नथुरामशी संबंधित प्रसंग धर्मवीर सिनेमात असेल तर महाविकास आघाडीतले पार्टनर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना ते चाललं नसतं. त्यामुळे हा सीन वगळला गेल्याचं समजतं आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी वीर सावरकरांचा उल्लेख केला. महाविकास आघाडीसोबत असताना आम्हाला वीर सावरकरांविषयी काहीही भूमिका घेता येत नव्हती असंही त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या वीर सावरकरांच्या पुतळ्यालाही त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अभिवादन केलं.

धर्मवीर सिनेमात आनंद दिघे बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात जातात तो सीन सूचक

धर्मवीर सिनेमात आनंद दिघे हे एक कट्टर शिवसैनिक होते हे दाखवलं गेलं. एवढंच नाही तर सिनेमात हे पण चित्रित करण्यात आलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश डावलून आनंद दिघे यांनी त्यांचे निर्णय घेतले. मो. दा. जोशी यांना तिकिट देण्यास बाळासाहेब ठाकरे इच्छुक नव्हते. मात्र आनंद दिघे यांनी मो. दा. जोशी यांचं तिकिट कन्फर्म केलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयाविरोधात आनंद दिघे जातात हा सीन दाखवून काय साधायचं आहे हे कदाचित उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं नसावं.

संजय राऊत निशाण्यावर

आनंद दिघे यांच्या आयुष्यातला वादग्रस्त चॅप्टर होता तो म्हणजे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या. त्यावेळी दिघे यांनी दिलेली एक प्रतिक्रिया त्यांच्या अडचणी वाढवणारी ठरली होती. ठाण्याच्या महापौरपदासाठीच्या निवडणुकीत श्रीधर खोपकर यांनी फुटून जात क्रॉस व्होटिंग केलं होतं त्यामुळे शिवसेना हारली होती आणि वसंत डावखरे जिंकले होते. त्यावेळी संजय राऊत हे एका मराठी साप्ताहिकासाठी काम करत होते. त्यांनी आनंद दिघे यांचं वक्तव्य हे मसालेदार पद्धतीने छापलं होतं.

या सिनेमात नमस्कार मी पत्रकार असं म्हणणारं पात्र हे थेट संजय राऊत यांच्याशी मिळतंजुळतं आहे.सिनेमा संपताना आनंद दिघे यांचं निधन आणि त्यानंतर होणारे अंत्यविधी दाखवले गेले आहेत. त्यावेळीही हा पत्रकार आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला यावर प्रश्न उपस्थित करतो. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून संजय राऊत त्यांच्यावर विविध आरोप करत आहेत ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आणखी अस्वस्थ झाले. त्यांनी ही अस्वस्थता बोलूनही दाखवली. संजय राऊत यांनी वाट्टेल ते आरोप करणं हे देखील आमदारांच्या असंतोषाचं एक कारण आहे असं बोललं जातं आहे.

राज ठाकरेंशी संबंधित असलेला तो सीन

या सिनेमाचा जो क्लायमॅक्स आहे त्याचीही चर्चा बरीच झाली. आनंद दिघे अपघातानंतर रूग्णालयात असतात, आपण आता जगणार नाही हे कदाचित त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळी राज ठाकरे त्यांना भेटायला येतात. हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे असं आनंद दिघे राज ठाकरेंना म्हणतात. हा प्रसंग उद्धव ठाकरे यांनी पाहिला नव्हता. त्यामुळेही एकनाथ शिंदे नाराज झाले होते. तसंच हा सिनेमा जेव्हा ZEE5 या अॅपवर प्रदर्शित झाला तेव्हा हा प्रसंग बदलण्यातही आला होता. ती टीका मनसेने केली होती.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली होती. शिंदे गटाला विलीनकरण करण्याची वेळ आली तर पर्याय मनसेचा असू शकतो य़ा चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लक्षात येतं की एकनाथ शिंदे हे या सिनेमाचे निर्माते नाहीत. मात्र ते सातत्याने हा सिनेमा प्रमोट करत आले आहेत. सिनेमात लपलेले हे संकेत आता सामान्य जनतेतही चर्चेचा विषय ठरले आहेत.लवकरच या सिनेमाचा सिक्वेलही येणार आहे त्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT